मुंबई

रेल्वे अपघातातील मृतांना खाकी वर्दीचा आधार

मंगेश सौंदाळकर

मुंबई - रेल्वे अपघातातील मृत प्रवासी पाहून आपण हळहळ व्यक्त करतो. छिन्नविच्छिन्न झालेला मृतहेद पाहून दोन क्षण हादरून जातो. बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यातील महिला शिपाई उज्ज्वला सागर पेडणेकर मात्र त्याला अपवाद आहेत. अपघातांतील मृतांना शवागारात नेण्यापासून त्यांचे अंत्यविधी करण्याचे काम त्या करत आहेत. दोन वर्षांत त्यांनी आतापर्यंत जवळजवळ १५० मृतदेहांचे अंतिम सोपस्कार पार पाडले आहेत.

उज्ज्वला यांचे शिक्षण घाटकोपरमध्ये झाले. पंतनगरमधील परेड मैदानातून त्यांना जावे-यावे लागत असल्याने त्यांना पोलिस दलाबाबत कुतूहल होते. जिद्दीच्या बळावर २००७ मध्ये त्या पोलिस दलात रुजू झाल्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पहिली पोस्टिंग झाली सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात. २०११ मध्ये मशीद बंदर स्थानकात गस्तीदरम्यान दुपारी त्यांना स्टेशन मास्तरांचा कॉल आला. रुळालगत पुरुषाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह पडला होता. पहिलाच प्रसंग असल्याने सुरुवातीला त्या घाबरल्या; पण कर्तव्याची जाण ठेवत त्यांनी मृतदेहाचा एक एक अवयव गोळा केला. एक अवयव मिळत नव्हता. त्यांनी तीन तास शोध घेतला आणि तो अवयव शोधून काढला. चार वर्षांपूर्वी उज्ज्वला यांची बदली बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात झाली. राममंदिर-दहिसर रेल्वे स्थानकादरम्यान दररोज एका तरी प्रवाशाचा मृत्यू होतो. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उज्ज्वला आणि त्यांचे सहकारी जखमीला रुग्णालयात नेतात. गंभीर अपघातांतील मृत प्रवाशांचे छिन्नविच्छिन्न अवयव गोळा करतात. ते शवागारात नेतात. एरवी शवागारात जाण्यास अनेकजण घाबरतात; पण उज्ज्वला यांना दिवसातून दोनतीन वेळा तिथे जावे लागते. अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटवणे कठीण असते. अशा वेळी उज्ज्वला आणि त्यांचे सहकारी कौशल्याचा वापर करत नातेवाईक शोधून काढतात. अपघाती शाखेत डोक्‍यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करावे लागते, असे उज्ज्वला सांगतात.

बाळाला जीवदान
एक अंध महिला पतीसोबत प्रसूतीकरता लोकलने सीएसएमटीत आली होती. तिथेच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. परिस्थिती नाजूक असल्याचे उज्ज्वला यांनी ओळखले. स्ट्रेचर येईपर्यंत त्यांनी महिलेच्या पोटावर हळूहळू दाब टाकायला सुरुवात केली. त्यानंतर तिने तिथेच बाळाला जन्म दिला. स्ट्रेचर आल्यावर बाळाला एका हातात घेऊन त्या महिलेला घेऊन सेंट जॉर्जेस रुग्णालयात गेल्या. बाळाची नाळ तशीच होती. तिथे गेल्यावर डॉक्‍टरांनी ती कापली. दुसऱ्या दिवशी महिलेचा पती उज्ज्वला यांना शोधत सीएसएमटीत पोहोचला अन्‌ खाकी वर्दीला सलाम ठोकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT