man on roof  
मुंबई

दादरमध्ये इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; तब्बल ४ तास चालला थरार..  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कौटुंबिक वादातून मानसिक नैराश्य आलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने दादर येथील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकऱ्यांनी या पोलिसाची समजुत काढत त्याला ताब्यात घेतल्याने हा अनर्थ टळला. सुमारे ४ तास हा थरार चालू होता. 

प्रशांत पाटील(30)(नाव बदलले आहे) हे सशस्त्र पोलिस दलात त कार्यरत आहेत. ते दादर पुर्वकडील शिंदेवाडी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत  राहतात. अशातच गेल्या अनेक दिवसांपासुन पाटील मानसिक नैराश्यात होते. त्याची पत्नी व इतर कुटुंबिय गावी वास्तव्याला असून कौटुंबिक वादातून त्यांच्या नैराश्य आले होते, अशी माहिती उपायुक्त(एलए) नंदकुमार ठाकूर यांनी दिली.  

 शनिवारी सकाळी पाटील शिंदेवाडी येथील शिवनेरी इमारतीच्या गच्चीवर गेले. येथुन ते आत्महत्येचा प्रयत्न करु लागले. मात्र हा सर्व प्रकार येथील नागरीकानी पाहताच, त्यांनी तत्काळ भोईवाडा पोलिसांना याची माहिती दिली. तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दल देखील या ठिकाणी पोहचले. 

याप्रकरणाची माहिती समजताच, तत्काळ पोलिस उपायुक्त सौरभ त्रीपाठी, सहाय्यक पोलिसमी आयुक्त संगिता पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक विनोद कांबळे घटनास्थळी पोहचत या पोलिस कर्मचाऱ्याला समजाविण्याचा प्रयत्न सुरु केला. अखेर तब्बल चार तासानंतर समजुत काढल्यानंतर अखेर या पोलिसाला ताब्यात घेत त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्यांची चौकशी करण्यात आली. 

police an tried to end his life in dadar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

Crime News : तुझे बाळ दे, एक लाख रुपये देते; दलाल माय-लेकीने विकत घेतला नवजात शिशू, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT