मुंबई

पूजा चव्हाण संशयित मृत्यू जनतेला माहिती का देत नाही? दरेकरांचा पोलीस महासंचालकांना सवाल

कृष्ण जोशी

मुंबई : पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री किंवा पोलीस महासंचालक जनतेला माहिती का देत नाहीत, असा प्रश्न आज प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आज यासंदर्भात पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर गेल्या 17 दिवसात संशय निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे लोकांच्या मनात चौकशीबाबत संभ्रम निर्माण झाला असताना तपासाबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती जनतेला दिलेली नाही.  यामुळे जनतेत विशेषतः महिलांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.  त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी याबाबत जनतेला माहिती द्यावी, अशी त्यांच्याकडे मागणी केल्याचे दरेकर म्हणाले. 

>

याप्रकरणी दरेकर यांनी पोलीस महासंचालकांना दिलेल्या पत्रात  14 महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांना वारंवार व्हिडीओ आणि फोनद्वारे धमक्या येत असल्याची बाबही पोलीस महासंचालकांच्या कानावर घातली असून याप्रकरणी देखील तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्याकडे केल्याची माहितीही त्यांनी दिली. 

या घटनेतील महत्वाचा दुवा अरुण राठोड व त्याचे नातलगही बेपत्ता आहे.  त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करीत आहेत ? अरुण राठोडच्या मूळ गावी असलेल्या घरात चोरी झाली असून याची चौकशी पोलिसांनी केली आहे का, मृत पुजा चव्हाणच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देणार का  ? 
अरुण राठोड व एक महिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी दाखल झाले होते, पोलिसांनी याबाबत चौकशी केली आहे का ? बेपत्ता मंत्र्यांची पोलिसांनी चौकशी केली का, या प्रश्नांची उत्तरे महासंचालकांनी द्यावीत, असेही दरेकर यांचे म्हणणे आहे.

------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

political latest Why doesnt Pooja Chavan inform the public suspected death said pravin darekar bjp politics updates

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT