pavin darekar sakal
मुंबई

Political News : स्वतःच्या पक्षाच्या ऱ्हासाची चिंता शरद पवार यांनी करावी; प्रवीण दरेकर यांचा टोला

पवार यांनी भाजप आणि बावनकुळे यांची चिंता करू नये; अजितदादांसारख्या नेत्याबरोबर आपला ९० टक्के पक्ष का निघून गेला, याचा विचार त्यांनी करावा.

सकाळ वृत्तसेवा

मुंंबई - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपची आणि भाजप नेत्यांची नसती उठाठेव करू नये. त्यांनी स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास का होत आहे, याचे आत्मपरिक्षण करावे, असा टोला भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.शरद पवारांनी नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. यासंदर्भात समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसिद्ध करून दरेकर यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 

पवार यांनी भाजप आणि बावनकुळे यांची चिंता करू नये. अजितदादांसारख्या नेत्याबरोबर आपला ९० टक्के पक्ष का निघून गेला, याचा विचार त्यांनी करावा. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यासारखे ज्येष्ठ व एकनिष्ठ साथीदार आपल्याला का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. पवार यांनी भाजपची आणि भाजप नेत्यांची नसती उठाठेव करू नये, तर स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास का झाला, याचे आत्मपरीक्षण करून त्यांची चिंता करावी, असा सल्ला दरेकर यांनी दिला आहे.

बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली नसली, तरी त्यांना राज्य प्रदेशाध्यक्ष केले आहे. ते पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरून पक्षविस्तार करीत आहेत. त्यांनी राज्यात आपले नेतृत्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे पवार यांनी भाजपची आणि बावनकुळे यांची चिंता करू नये, असेही दरेकर यांनी सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT