मुंबई

शिवसेनेवर नाराजी, आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी; हायकमांड घालणार का लक्ष ?

सुमित बागुल

बदलापूर : बदलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढत आहे. ही ताकद आणखी वाढवून युवा शक्तीच्या बळावर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढवाव्या लागतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी केले. 

बदलापुरातील 20 तरुणांनी प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या वेळी या युवकांचे स्वागत करून देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी बोलताना देशमुख यांनी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तरुणांनी जोमाने सक्रिय व्हावे असे आवाहन केले.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, जिल्हा सेवा दल कार्याध्यक्ष हेमंत यशवंतराव, महिला शहर अध्यक्षा अनिसा खान, कामगार सेलचे शहराध्यक्ष सूर्यराव, ज्योती वैद्य, ज्योती बैसणे आदी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मानकीवली भागात वृक्षारोपण करण्यात आले. शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ यांनी आयोजित केलेल्या या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत मानकीवली भागातील इमारतींलगत तसेच रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. 

शिवसेनेवर नाराजी 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले निवडून आलेल्या प्रभागात जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घटनाप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे महत्त्वाचं विधान केलेलं. यापुढे या प्रभागातून शिवसेनेचा नगरसेवक निवडून येईल, असा दावा त्यांनी केला होता. त्यावर दामले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

political news from ulhasnagar ncp is planning to contest election with full strength against shivsena

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT