मुंबई

वेतन करारावरून बेस्टमध्ये राजकारण 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात लागण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बेस्टच्या सातव्या वेतन आयोग करारावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झाले आहे. बेस्ट कामगार सेनेने बेस्ट प्रशासनासोबत केलेला वेतन करार कृती समितीला मान्य नाही. त्यामुळे या करारावरून वाद चिघळण्याची शक्‍यता आहे. 

बेस्टच्या कामगारांचा वेतनाबाबतचा सामंजस्य करार बेस्ट समितीच्या शुक्रवारी (ता. 13) झालेल्या सभेत मंजूर झाला. हा करार शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने केला आहे. बेस्टमध्ये बेस्ट कामगार सेनेच्या विरोधात इतर संघटना एकवटल्या आहेत. राज्य सरकारने 26 जुलै 2019 पासून बेस्टला "बीआयआर ऍक्‍ट'मधून वगळले आहे. त्याऐवजी आता "इंडस्ट्रिअल ऍक्‍ट' लागू झाला आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेसोबत करार करण्याचे बंधन प्रशासनावर राहिलेले नाही. बेस्टमध्ये कार्यरत विविध संघटनांनीही वेतन फेरआढाव्यासाठी त्यांचे मागणीपत्र बेस्ट उपक्रमाला सादर केले. बीआयआर ऍक्‍ट रद्द झाल्यामुळे मान्यताप्राप्त कामगार संघटनेशिवाय इतर कामगार संघटनांनाही वेतन करार करण्याची संधी मिळणार आहे. बेस्ट कामगारांच्या वेतन करारामुळे सध्या बेस्टवर 1018 कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. हा करार कामगारांचे आर्थिक नुकसान करणारा असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बेस्टच्या वेतन कराराचा मुद्दा चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कृती समितीला कामगारांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. प्रशासनासोबत वाटाघाटी सुरू असल्याने कृती समितीने संपाचा निर्णय स्थगित ठेवला आहे. 

25 सप्टेंबरपर्यंत करारावर सह्या? 
बेस्ट प्रशासनाने 2016 ते 2021 पर्यंतचा वेतन सामंजस्य करार केला असून त्यावर शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेना आणि भाजपप्रणीत बेस्ट कामगार संघाने 5 सप्टेंबरला सह्या केल्या आहेत. इतर 22 कामगार संघटनांना 25 सप्टेंबरपर्यंत सह्या करण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. या संघटना या मुदतीत सामंजस्य करारावर सह्या करतील, असा विश्‍वास प्रशासनाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

सार्वजनिक स्वच्छतागृहात अल्पवयीन तरुणांची नशापार्टी, ड्रग्सचा डबल डोस घेताच १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; चक्रावणारा व्हिडिओ Viral

‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या...

PM Kisan Scheme for Women Farmers : महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' अटी पूर्ण केल्यास खात्यात जमा होणार वार्षिक 6 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि नियम

SCROLL FOR NEXT