मुंबई

UnlockEffect: प्रदूषणामुळे खाडीचा श्वास कोंडला; पाणी प्रदुषित झाल्याने जलचर व पर्यावरणाला धोका

दीपक शेलार

ठाणे ः कोरोनामुळे गेले पाच-सहा महिने वाहने, उद्योगधंदे आदी ठप्प असल्याने वातावरणातील प्रदुषण घटले होते. त्यातच पर्यावरणभिमुख उत्सवासाठी आग्रही असलेल्या ठाणे महापालिकेने दरवर्षीप्राणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून खाडी आणि तलावातील पाण्याचे प्रदूषण होण्यापासून रोखले होते. मात्र, हळूहळू सर्वत्र अनलॉक होत असल्याने  कारखान्यांमुळे खाडीतील पाणी प्रदुषित होऊ लागले आहे. भरतीच्या वेळी तर राडारोडा आणि केरकचरा खाडीकिनारी पसरत असल्याने जलचरांसह पर्यावरण आणि मानवी वस्तीला धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तलावांचे शहर असलेल्या ठाण्याला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्यामुळे शहराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. गेले काही महिने लॉकडाऊनमुळे खाडी निर्मळ आणि स्वच्छ झाली होती. त्यानंतर गणेशोत्सवातदेखील ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने केलेल्या पर्यावरणपुरक उपाययोजनामुळे खाडी व तलावातील प्रदुषण रोखण्यास मदत झाली. परंतु,आता टप्याटप्याने होत असलेल्या अनलॉकमुळे उद्योगव्यवसाय व कारखाने सुरू झाल्याने कारखान्यातील रसायने, सांडपाणी, मलमूत्र आदी थेट पाण्यात मिसळल्याने खाडी प्रदुषणाच्या खाईत लोटली गेली आहे. त्यामुळे खाडीतील प्राणवायू कमी होऊन मासे, खेकडे, कोळंबी, कासव, पाणसाप आदी जलचर प्रजाती तसेच, खारफुटी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे निरिक्षण पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.

अनलॉकनंतर सुरू झालेल्या उद्योग व्यवसायांमुळे खाडीचे पाणी प्रदुषित झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही ठाणे महापालिकेमार्फत खाडी संवर्धनाबाबतच्या उपाययोजना नियमितपणे राबवल्या जात आहेत. किंबहुना, भरतीच्या वेळांमध्ये खाडीकिनारी फेकलेला कचरा वाहत येत असल्यानेही प्रदुषणात भर पडण्याची शक्यता आहे.
- मनीषा प्रधान,
प्रदूषण नियंत्रण अधिकारी, महापालिका

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पर्यावरण स्वच्छ झाले होते. मात्र, आता अनलॉक होऊ लागल्याने वाहनांची वर्दळ वाढली असून हवेतील प्रदुषणात वाढ झाली आहे. गुरूवारी ठाणे खाडीत भरतीच्या पाण्यात केरकचरा व अनेक प्रदुषित घटक आढळले. 
- भरत मोरे,
पर्यावरण मित्र

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुलगाममध्येही 'पहलगाम पॅटर्न'? धर्म विचारून मजुरांची हत्या? तपास सुरू

Revenue Camp: थेऊर समाधान शिबिरात ग्रामीण भागात महसूल दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांची पाणंद रस्त्यांसाठी भरीव निधीची घोषणा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांचा धाक संपला, गुंडांचा बंदोबस्त करा; अन्यथा...; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

Pune Haveli Infrastructure Update: हडपसर–यवत, विमाननगर–शिरूर उन्नत मार्गामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव; आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा पुढाकार

Fishing Rules: राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! खोल समुद्रातील मासेमारी पुन्हा सुरू, पण निर्बंध कायम; सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT