...यामुळे झाली नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ 
मुंबई

..यामुळे झाली नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : गेल्या दोन दिवसांत तापमानात घट नोंदवण्यात आली असून, वाऱ्याची गतीही मंदावली आहे. शुक्रवारी (ता. १३) ढगाळ वातावरणामुळे २२ अंशांवर पारा घसरला होता. पारा घसरल्याने गारव्यात काहीशी वाढ झाल्याने हवेतील प्रदूषणकारी घटकांचा तापही वाढू लागला आहे. हवामान विभागाच्या सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद ठेवणाऱ्या संकेतस्थळावरही नवी मुंबईत हवेची प्रतवारी २२१ म्हणजेच ‘वाईट’ नोंदवण्यात आली आहे. 

गेले दोन आठवडे शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती; मात्र जसजशी तापमानात घट होऊ लागली व वातावरणातील गारवा वाढू लागला आहे, तसे पुन्हा प्रदूषणाने डोके वर काढले आहे. शुक्रवारी सकाळी हवेतील सूक्ष्म प्रदूषकांचे प्रमाण २२१; तर दुपारी २०९ पार्टिक्‍युलेट मॅटर्सची नोंद झाली होती. गुरुवारी (ता. १२) देखील नवी मुंबईतील तापमान २१ अंश से. नोंदवण्यात आले होते व हवेतील सूक्ष्म प्रदूषकांचे प्रमाण आजच्या इतकेच २०९ पार्टिक्‍युलेट मॅटर नोंदवले गेले. शनिवारीदेखील पारा तिशीत राहणार असून, प्रदूषणाची प्रतवार २१६ असेल, अशी शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 

नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ होण्यामागे सातत्याने सुरू असलेली बांधकामे, खाणकामे, विविध विकासकामे असून यामुळे धुळीकणांमध्ये वाढ होते; तर मुख्य कारण रस्त्यावर वाढलेली वाहने व वाहतूक कोंडी असल्याचे सांगितले जाते. थंडीमुळे वाहनांमधून निघणारे कार्बन आणि हवेतील धूलिकण हवेत वरच्या बाजूस न जाता वातावरणाच्या खालच्या थरात राहतात. तसेच या काळात हवेचे अभिसरण होण्याची प्रक्रिया मंदावत असल्याने प्रदूषणातही वाढ होत असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

थंडीत प्रदूषणाचा ताप अधिक
हिवाळ्यात किंवा वातावरणात गारवा वाढतो. तेव्हा सकाळी जमिनीलगतचे तापमान कमी असते, तर वातावरणाच्या वरच्या थरातील तापमान अधिक असते. परिणामी, हवेतील प्रदूषणकारी धूलिकण ज्यांचा आकार २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी असतो. ते वर जाऊन हवेत मिसळू शकत नाही. हे धूलिकण जमिनीलगतच्या थरातच तरंगत राहत असल्याने प्रदूषण वाढल्याचे जाणवते. उन्हाळ्यात वा पारा चढा असताना वरच्या थरात थंड व जमिनीलगत गरम हवा असते. त्यामुळे प्रदूषित धूलिकण सहज तरंगत वरच्या हवेच्या संपर्कात येतात. गरम व थंड हवा एकत्र येऊन नैसर्गिकरीत्या हवा शुद्ध होण्याची प्रक्रिया ही या काळात सहज होते, ती थंडीत होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : आमदार निवासातील कँटिन चालकाला दणका, अन्न व औषध प्रशासनाने केली मोठी कारवाई

Viral Video: शेवटी ते बापाचं काळीज! भारतातून कॅनडाला गेलेल्या वडिलांनी लेकं अन् नातीला दिलं भावनिक सरप्राइज

Pune News : खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे

Guru Purnima 2025: ज्यांनी केवळ अभिनयच नाही, आयुष्यही शिकवलं; कलाकारांच्या गुरूविषयी आठवणी

Satara News : कराड हादरलं! अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; जन्मदात्यांचीच 'तिला' जीवे मारण्याची धमकी..

SCROLL FOR NEXT