मुंबई

काय आहे अधिक जलद आणि टेस्टिंग किट्सची बचत करणारं 'पूल टेस्टिंग' तंत्रज्ञान?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. देशभरात मुंबईती सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० तारखेपर्यंत या आधीच महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. येता आठवडा हा आठवडा मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा मनाला जातोय. अशात चर्चा आहे ती मुंबईत होणाऱ्या रॅपिड टेस्टिंगची, मुंबई महापालिकेककडून दक्षिण कोरियातून रॅपिड टेस्टिंग किट्स मागवण्यात येणार असून मुंबईत रॅपिड टेस्टिंग करण्यात येणार आहे. दरम्यान अजून या टेस्टिंगला सुरवात झालेली नाही.  

अशातच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या आधीच मुंबईत 'पूल टेस्टिंग' करण्यात येणार असल्याचं बोलून दाखवलं होतं. कमी किमतीत जास्तीत जास्त टेस्टिंग करण्यासाठी आणि जलद गतीने टेस्टिंग करण्यासाठी पूल टेस्टिंग पद्धत अवलंबली जातेय. सध्या ICMR ची परवानगी घेऊन उत्तर प्रदेशातील लखनौ मध्ये कोरोना पूल टेस्टिंग सुरु असल्याची माहिती आहे, त्याबाबत बातम्या प्रकाशित झाल्यात. अशात मुंबई सारख्या सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या शहरात पूल टेस्टिंग महत्त्वाचं ठरू शकत.   

पूल टेस्टिंग म्हणजे नक्की काय ?

भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत चाललाय. अशात भारत येत्या काही दिवसात दहा हजार (१०,०००) कोरोना रुग्णांचा आकडा गाठणार आहे. म्हणूनच पूल टेस्टिंग महत्त्वाचं आहे. ICMR च्या नियमांप्रमाणे पूल टेस्टिंग मध्ये एकाचवेळी पाच जणांचे SWAB एकत्रित गोळा केले जाणार आहेत. या एकत्रित SWAB ची टेस्ट केली जाईल. यापैकी कुणालाही कोरोना नसेल तर स्वाभाविकच ही टेस्ट निगेटिव्ह येणार आहे. आणि सर्वांना निगेटिव्ह घोषित केलं जाईल. अशा प्रकारे एकाच वेळी, कमी वेळात आणि कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांचे SWAB तपासण्यात येऊ शकतात. मात्र पाच जणांचं SWAB सॅम्पल पॉझिटिव्ह आढळलं तर त्यातील पाचही जणांची वेगवेगळी SWAB टेस्टिंग केली जाणार आहे.    

महाराष्ट्राला केंद्राकडून रॅपिड टेस्टिंगची परवानगी मिळाली आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रात रॅपिड टेस्टिंग सुरु झालेली नाही. अशात आता उत्तर प्रदेशातील लखनौच्या धर्तीवर मुंबईत आणि महाराष्ट्रातील रेड झोनमध्ये पूल टेस्टिंग हा पर्याय अवलंबला जाऊ शकतो.  

pool testing in mumbai for faster and cost efficient corona swab testing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : दोन हेवी वेट संघ भिडणार, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

SCROLL FOR NEXT