Heart problems
Heart problems sakal media
मुंबई

तरुणांनो हृदय सांभाळा ! पोस्ट कोविड तक्रारी वाढल्याने जनजागृतीचे आवाहन

मिलिंद तांबे

मुंबई : शहरात तरुणांमध्ये पोस्ट कोविड (post covid) हृदया संबंधी (health problems) तक्रारी वाढल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण(doctors survey) आहे. तरुणांमध्ये यासंबंधी जागृती करणे गरजेचे असून त्यामुळे वेळेत उपचार करणे शक्य होईल असे डॉक्टरांचे म्हणने आहे. एक 18 वर्षीय तरुणीला हार्ट अटॅक (heart attack) आल्यानंतर उपचारासाठी केईएम रुग्णालयात (KEM hospital) दाखल करण्यात आले. या तरुणीमध्ये कोविडची (corona symptoms) कोणतीही लक्षणे नव्हती तसेच तिचे लसीकरणही (corona vaccination) झालेले नव्हते. मात्र तिच्या अँटीबॉडीजची तपासणी केली असता ती मात्र पॉझिटिव्ह आली.

त्यामुळे तिच्या हार्ट अटॅकचा कोविडशी संबंध असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोविड संसर्गाच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये हृदया संबंधी तक्रारी वाढल्या आहेत. हृदयाशी निगडित वेगवेगळया समस्या घेऊन येणाऱ्या तरुण रुग्णांची संख्या ही वाढली आहे. अशा तरुणांनी आपल्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शिवाय आरोग्या विषयी जागृती करणे देखील गरजेचे आहे.यामुळे आरोग्या विषयी काही तक्रारी उद्भवल्या तर वेळेत उपचार घेणे शक्य होणार असल्याचे डॉक्टर सांगतात.

कोविड आजारातून बरे झाल्यानंतर किंवा बरे झाल्यानंतर चार ते सहा आठवड्या दरम्यान हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. पण हे इतर संसर्गामुळे देखील होण्याची शक्यता देखील आहे. कोरोना काळात आरोग्य विषयक तक्रारी मात्र वाढल्या आहेत. डेंग्यू किंवा इतर संसर्गापेक्षा कोरोना महामारी आल्यापासून हार्ट अटॅक च्या तक्रारी वाढल्या आहेत असे पी.डी. हिंदुजा रुग्णालयाचे हृदयरोग तज्ञ डॉ.सुधीर पिल्लई यांनी सांगितले. कोविडमध्ये हृदयावर हल्ला करण्याची देखील प्रवृत्ती असते, तसेच हृदयामध्ये गुठळ्या होणे तसेच ब्लड सर्क्युलेशन वर परिणाम होत असल्याने मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचा झटका येतो असे ही त्यांचे म्हणणे आहे. शिवाय मायोकार्डिटिस नावाची दाहक प्रतिक्रिया होऊन हृदयाचे स्नायू कमकुवत होतात त्यामुळे देखील हार्ट अटॅक चे प्रमाण वाढते असे ही त्यांचे म्हणणे आहे.

"आम्ही अगदी तरुण लोकांना हृदयविकाराच्या झटका येताना पाहिले आहे, परंतु यामागे कोविड हेच एक कारण असल्याचे सिद्ध करणे कठीण आहे" असे केईएम हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.प्रफुल केरकर म्हणाले. तथापि, प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यावी;स्वतःचे लसीकरण करावे आणि कोविड -19 नियमांचे पालन करणे आवश्यक असून हृदयरोग रुग्णांनी त्यांची औषधे सुरू ठेवावीत” असे ही ते पुढे म्हणाले. कोविड काळात कोविडची भीती आणि चिंता वाढली असल्याचे फोर्टिस हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हसमुख रावत म्हणाले.

छातीत दुखण्याच्या तक्रारी घेऊन बरेच तरुण येत असल्याचे सध्या आपण पाहत आहोत. त्याशिवाय, कोविडमुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमुळे काही आठवड्यांपासून ते बरे झाल्यानंतरच्या काही महिन्यांपर्यंत हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे टाळण्यासाठी, आम्ही रक्त पातळ करणारी औषधे चार ते आठ घेण्याची आठवड्यांची शिफारस करतो असे ही डॉ.रावत म्हणाले.

पोस्ट कोविड नंतर, हृदय निरोगी ठेवण्यासाठी, नियमित हृदयाची तपासणी केली पाहिजे असे डॉक्टर सुचवतात. निरोगी आहार घेणे, शारीरिकरित्या सक्रिय राहणे आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घेणे गरजेचे असल्याचे डॉ.पिल्लई म्हणाले. “छातीत जडपणा, श्वासोच्छवास घेण्यास त्रास यांसारख्या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवे. जर कुणी आधीच हृदय रोगी असेल आणि त्याची लक्षणे वाढत असतील तर ताबडतोब डॉक्टरकडे जाणे महत्वाचे आहे. जर तुम्ही सहा आठवडे ते तीन महिन्यानंतर बरे झाले असाल, तर कुठल्याही अवघड क्रिया किंवा व्यायाम करू नका यामुळे शरीरावर विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त ताण येऊ शकतो" असे ही डॉ.पिल्लई यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT