मुंबई

मुंबई लोकलमधून प्रवास करताय, क्यु-आर कोड संदर्भातली मोठी अपडेट

पूजा विचारे

मुंबईः कोविड-१९चा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, अत्याश्यक सेवेसाठी विशेष रेल्वे सेवा सुरु आहे. अत्याश्यक कर्मचाऱ्यांचीही वाढती गर्दी पाहता रेल्वेनं क्यु-आर कोड प्रणाली लागू केली. या प्रणालीनुसार क्यु-आर कोड पास असेल तरच कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करता येईल. यासाठी ३० जुलैची डेटलाईन देण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून होणारा विलंब लक्षात घेता ही क्यु-आर कोडची मुदतवाढ १० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी क्यु आर कोडशिवाय प्रवास करु शकणार आहेत. 

राज्य सरकारनं कोणतीही औपचारिक घोषणा न केल्याने लोकल ट्रेन प्रवासासाठी क्यूआर कोड अनिवार्य करण्याची मुदत आणखी पुढे ढकलण्यात आली आहे.  सुरुवातीला ३० जुलैची डेटलाईन होती. नंतर १० ऑगस्टपर्यंत त्याला स्थगिती मिळाली आहे. दरम्यान आता आणखी काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला ये-जा करण्यासाठी विशेष लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी ‘क्यु-आर’ कोडचा आधारित पास सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे.

क्यूआर पासची स्थिती स्पष्ट करताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, राज्य सरकार २४ तास काम करत होते. एकूण ३.२ लाख लोकांपैकी सुमारे २.४५ लाख आवश्यक कामगारांचा डेटाबेस प्रविष्ट करुन अपलोड करण्यात आला आहे.  इतर ७५ हजार  डेटाबेस प्रविष्ट आणि अपलोड करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यापैकी जवळपास १ लाख पास तयार केले गेले आहेत आणि सुरुवातीला स्कॅनिंग मोबाईल अॅप्सद्वारे केले जाईल आणि नंतर स्टेशनवर स्थापित मशीन्सद्वारे दुसऱ्या टप्प्यात स्कॅन केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली आहे. 

मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेरील अत्यावश्यक प्रवाशांसाठी हा 'क्यूआर कोड' पास बंधनकारक असेल. त्यानुसार हा क्यु-आर कोडबाबत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यावश्यक कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरु करण्याचे ठिकाण, कार्यालयाच्या वेळा आणि अन्य तपशील यांची माहिती एकत्र करण्याचे काम राज्य सरकारने सुरु केले आहे. मात्र कमी कर्मचाऱ्यांमुळे हे काम होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने हा पास मिळेपर्यंत ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची मुभा दिली आहे.

Postpones QR Codes For Local Trains Essential Workers travel Without E Passes

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT