Road Construction Innovation esakal
मुंबई

Road Construction: पाच मिनिटात बुजविता येईल रस्त्यावरील खड्डा!

खड्डे बुजविण्याच्या कंपनीचा पुढाकार, पालिकेस सादर केले प्रात्यक्षिक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांनी दुरावस्था झाली असून वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. खड्डे बुजवायचे म्हटले की डांबरीकरणासाठी रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवा, डांबरीकरण सुकण्यासाठी लागणारा वेळ आदि प्रक्रीया खूप वेळ खाऊ आहे. रस्त्यावरील वाहतूक बंद न करता अवघ्या पाच मिनिटात सीमेंट, खडी व पाण्याचा वापर करत खड्डे बुजविता येतील असा दावा एका कंपनी केला आहे. याचे प्रात्यक्षिक शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या उपस्थितीत बुधवारी कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेल रोड व आग्रा रोडवर राबिवण्यात आले. खड्ड्यातील हे मिश्रण कशा पद्धतीने टिकते यावरुन कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत हा प्रयोग राबवायचा का याचा विचार केला जाईल अशी माहिती यावेळी शहर अभियंता अहिरे यांनी सांगितली.

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. यावर उपाय योजना म्हणून पालिका प्रशासनाने आत्तापर्यंत विविध प्रयोग राबविले आहेत. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे खड्डे बुजवून देखील ते तग धरत नव्हते. तसेच डांबरीकरण करावयाचे झाल्यास वाहतुकीसाठी तो रस्ता बंद करणे, डांबर सुकण्यासाठी लागणारा कालावधी आदि प्रक्रीया ही वेळखाऊ आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविले जावेत यासाठी पालिका प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर प्रयोग करत असून अल्ट्रा फाईन पॉट निक कंपनीने अवघ्या पाच मिनिटात सीमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आलेला रस्त्यावरील खड्डे बुजविता येतील असा दावा केला आहे. खड्ड्यात खडी, सिमेंट टाकण्यात येत असून त्यावर पाण्याचा मारा केल्यास ते अवघ्या काही मिनिटात सेट होत असल्याचे कंपनी कर्मचाऱ्यांनी सांगितले. सीमेंट त्वरीत सेट होण्यासाठी त्यामध्ये काही केमिकलचा मारा करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

याविषयी पालिकेचे शहर अभियंता अहिरे म्हणाले, अल्ट्रा फाईन पॉट निक या कंपनीने असा दावा केला आहे की, क्विक सेटींग सिमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करुन अवघ्या काही मिनिटात रस्त्यावरील खड्डे बुजविता येऊ शकतात. यामध्ये पाणी, खडी आणि सिमेंटचा वापर करण्यात येत आहे. सीमेंट मध्ये विशिष्ट पद्धतीचे केमिकल मिक्स करण्यात आले आहे. यामुळे या मिश्रणावर पाण्याचा मारा केल्यानंतर ते लगेच सेट होते. यासाठी वाहतूक बंद करण्याची गरज नाही. यावरुन वाहने गेल्यासही खड्ड्यातील मिश्रण बाहेर पडणार नाही असे सांगितले आहे. याचे प्रात्यक्षिक आम्ही करुन पाहीले आहे. त्यामुळे खड्डे त्वरित बुजविले जात असतील तर त्याचा विचार केला जाईल. सीमेंटच्या रस्त्यावर हे प्रात्यक्षिक राबविले असून, डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर देखील हे उपायकारक ठरते का हे पाहीले जाईल असे शहर अभियंता अहिरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi reply to Delhi traders : "मोदींना सांगा 'आरोपी नंबर ४' ला हटवा, ३० सेकंदांत आंदोलन थांबवतो!"; १० हजार कोटींच्या नुकसानीच्या पत्रावर राहुल गांधींची थेट अट

Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

Maharashtra Live News: पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटी

Blinkit Fake customer care fraud : फुटलेल्या दह्याचे पैसे परत मागणे पडले महागात! व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून 'GPay' उघडताच अवघ्या ६० सेकंदांत बँक खाते रिकामे

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

SCROLL FOR NEXT