Prabhakar Sail Team eSakal
मुंबई

प्रभाकर साईल मुंबई पोलिसांच्या चौकशीला राहणार हजर

प्रभाकर साईल NCB चौकशीला जाणार नाही.

सुरज सावंत

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan khan drug case) २५ कोटी डीलचा आरोप करुन खळबळ उडवून देणारा प्रभाकर साईल (prabhakar sail) आज मुंबई पोलिसांच्या चौकशीला हजर राहणार आहे. प्रभाकर साईल कार्डीलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एक पंच आहे. शाहरुखचा मुलगा आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटीची मागणी केल्याचा आरोप साईलने केला होता. त्याच्या या गौप्यस्फोटानंतर मुंबई झोनलचे संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या विश्वासहर्तेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

प्रभाकर साईल आज NCB च्या चौकशीला उपस्थित राहणार नाही. पण प्रभाकर साईल मुंबई पोलिसांच्या चौकाशीला उपस्थित राहणार आहे. दुपारी 3.30 वाजता प्रभाकर साईल उपस्थित राहील. प्रभाकर साईलला NCB चे समन्स नसल्याने NCB चौकशीला जाणार नाही.

प्रभाकर साईल किरण गोसावीचा अंगरक्षक आहे. आज सकाळीच मागच्या काही दिवसांपासून फरार असलेल्या गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली. तो सुद्धा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच आहे. प्रभाकर साईलने केलेले आरोप किरण गोसावीने फेटाळून लावले आहेत. तसंच प्रभाकर साइल हा खोटं बोलत असल्याचंही किरण गोसावीने म्हटलं आहे.

"एनसीबीने चौकशीसाठी कोणतेही समन्स बजावलेलं नाही. एनसीबीने मीडिया ट्रायल करू नये. रीतसर एनसीबीने समन्स द्यावं" असं प्रभाकर साईलच्या वकिलाने म्हटलं आहे. "एनसीबी 8 तास का थांबले होते ? गुन्हा दाखल करायला कोणती डील होत होती का? अजून तरी एनसीबीने आम्हाला चौकशी साठी बोलवलेलं नाही. मुंबई पोलिसांनी बोलावलं, तर आम्ही चौकशी साठी जाऊ" असे प्रभाकरचे वकील तुषार खंदारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT