पीक विमा योजन file photo
मुंबई

Alibag News : वनहक्‍क जमीनधारकांनाही यंदा एक रुपया पीक विम्‍याचा लाभ; आज शेवटचा दिवस

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत, सोमवारी ३१ जुलै आहे.

सकाळ वृत्तसेवा

Alibag - जिल्ह्यातील वनहक्क जमिनीधारक शेतकऱ्यांनीही एक रुपया पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत, सोमवारी ३१ जुलै आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.

खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये केवळ एका रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगामात भात व नाचणी या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना वन जमिनीचे वाटप करण्यात आले आहे.

अशा जमिनीची नोंद दळी प्लॉट (वनखंड) स्वरूपात आहे.अशा वनजमिनीबाबत सातबारा उतारे पीक विमा पोर्टलवर येत नसल्याने, जिल्ह्यातील असे अनुसूचित जमाती व इतर वननिवासी शेतकऱ्यांच्या नावे सातबारा उतारे निघत नाहीत.

वनहक्कधारक (दळी प्लॉट) शेतकरी व ७/१२ संगणीकृत न झालेल्या शेतकऱ्यांची जमीनधारणा दस्तावेजांच्या मर्यादा लक्षात घेऊन जिल्ह्यातील भात व नाचणी पीक घेणारे व पीक विमा योजनेमध्ये सहभागी इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीक विमा हप्ता रुपये एक भरून तसेच आवश्यक कागदपत्रे जमा करावीत,असे आवाहन बाणखेले यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT