Sharad Pawar, Uddhav Thackeray and Prakash ambedkar 
मुंबई

Prakash Ambedkar : राष्ट्रवादीवरचे शिंतोडे शिवसेना स्वत:वर का घेतेय; आंबेडकरांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात महाविकास आघाडी सामील होणार की, नाही याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र ऐन मोर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरची शिंतोडे शिवसेना आपल्या अंगावर का घेतेय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.  

दरम्यान सीमावादात काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोषी आहेत. जेवढ्या लवकरात लवकर शिवसेना दोघांपासून वेगळी राहिल तेवढे त्यांच्यावर शिंतोडे उडणार नाही. मात्र आता अविकासीत गावांमुळे शिवसेनेवरही शिंतोडे उडतील. माझं एवढच म्हणण आहे की, सीमावादाचे शिंतोडे शिवसेना त्यांच्यावर का उडवून घेतेय, असा माझा सवाल असल्याचं आंबेडकर म्हणाले. तसेच मोर्चात सीमावादाचा मुद्दा नव्हता. मात्र ऐनवेळी अजित पवार यांनी सीमावाद आमचा मुख्य मुद्दा असल्याचं स्पष्ट केल्याचंही आंबेडकर यांनी नमूद केलं.

हेही वाचा काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

दरम्यान शिवसैनिक आम्ही एकच आहोत हे दाखविण्यासाठी उत्सुक असल्याचं मी उद्धव ठाकरेंना बोललो होतो. तेव्हा हा कार्यक्रम शिवसेनेच्या बॅनरखाली करा, असं मी बोललो होतो. मात्र उद्धव यांनी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोहत सरकारमध्ये सोबत होतो, असं सांगितलं. मात्र या मोर्चात शिवसेना आपली ताकद दाखवणार हे निश्चित असल्याचं आंबेडकरांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT