prakash ambedkar asaduddin owaisi 
मुंबई

मुंबईत वंचितचा AIMIM विरोधात शड्डू, 'या' मुस्लीम पक्षासोबत युती

ओमकार वाबळे

येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्यात महत्वाच्या महानगपालिका निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी मुंबईत सर्वपक्षीयांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना मुंबईत सोबत लढणार का, यावर बंद दरवाजाआड चर्चा सुरू असल्याच्या बातम्या राजकीय गोटातून समोर येत आहेत.

भाजपला राज्यातील सत्तेत विरोधात बसावं लागल्याने मुंबईत भाजप यंदा तयारीने उतरणार, हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वाचं लक्ष्य होतं. त्याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी खुलासा केला आहे.

लोकसभा निवडणुकीला भारिप आणि असदुद्दिन ओवैसींची एमआयएम यांनी एकत्र येत युती केली. काही जागाही एकत्र लढल्या. मात्र विधानसभेला दोन्ही पक्ष वेगळे झाल्याने राज्यात प्रकाश आंबेडकर हे मुस्लीम समुदाय सोबत घेण्यासाठी चाचपणी करत होते. अखेर एमआयएमची मतं फोडण्यासाठी त्यांना पर्याय सापडला आहे. यासंदर्भात आंबेडकरांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचा माहिती दिली. येणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी मुस्लीम लीगसोबत निवडणूक लढणार आहे.

यासोबत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाला देखील सोबत घेतलंय. याशिवाय त्यांनी काँग्रेसकडेही आघाडीचा कौल मागितल्याचं कळतंय. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जागा वाटपाचा कार्यक्रम आखू शकते. शिवसेना आमच्यासोबत आली तरी आम्ही तयार आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.

मुंबईतील मुस्लीम मतांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न सध्या एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी करत आहेत. यासाठी त्यांनी कालच चांदवलीत सभा घेतली. इम्तियाज जलील यांच्यापासून अनेक बडे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. मुंबईतील मुस्लीमबहुल भागात उमेदवार देऊन एमआयएम या निवडणुकीत संधी साधण्याच्या प्रयत्नात आहे. अशा वेळी आंबेडकरांनी मुस्लीम लीगला सोबत घेऊन मत फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT