prasad lad sakal
मुंबई

मुंबई : प्रसाद लाड करोडपती 'पगारदार'

दरेकरांप्रमाणेच मुंबई बँकेत आणखी तीन 'श्रीमंत' मजूर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रवीण दरेकर यांच्याप्रमाणे मुंबई बँकेत आणखी तीन श्रीमंत मजूर असून प्रसाद लाड हे स्वतःच कंपनीचे संचालक असताना ते कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत कामगार असल्याचे दाखवून 'पगारदार' पतसंस्था प्रवर्गातून मुंबई बँकेचे संचालक आहेत. या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी सहकार सुधार समितीच्या वतीने आज येथे करण्यात आली.

बँक कामगारांचे राष्ट्रीय नेते विश्वास उटगी आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. आपण कामगार असल्याची खोटी माहिती प्रतिज्ञापत्रावर देणाऱ्या दरेकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. दरेकरांप्रमाणेच मुंबई बँकेत आनंदराव गोळे, विनोद बोरसे आणि विठ्ठल भोसले हे तिघे बोगस पुरावे देऊन मजूर प्रवर्गातून संचालक झाले आहेत. त्यांचे स्वतंत्र व्यवसाय आणि कोट्यवधींच्या मालमत्ता आहेत, असाही आरोप उटगी यांनी केला.

संचालक आमदार प्रसाद लाड यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत पगारदार नोकर असल्याचे दाखवून ते पगारदार नोकरांच्या पतसंस्था गटातून मुंबई बँकेवर निवडून येतात. या सर्वांविरुद्ध सहकार निबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. पण सहकार विभागाने त्या तक्रारीची दखलही न घेता या सर्वांना बँक निवडणुकीत पात्र उमेदवार म्ह्णून घोषित केले, असेही शिंदे यांनी दाखवून दिले.

अनेक घोटाळ्यांच्या मालिकाच दरेकरांच्या नावाशी जोडलेल्या आहेत. त्यांची सखोल चौकशी झाल्यास अनेक सत्य उघडकीस येतील, असेही उटगी यांनी सांगितले. मुंबई बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमल्यास बँकेत नेमका किती घोटाळा झाला हे समोर येईल. तसेच रिझर्व्ह बँकेने २०१५ मध्येच संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. तरीही तेव्हाच्या सरकारने दरेकरांचे घोटाळे का दडपून ठेवले, याचीही चौकशी सरकारने करावी, अशी मागणीही उटगी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT