मुंबई

प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा भाईंदरमध्ये साकारणार 'वारकरी भवन'

संदीप पंडित


भाईंदर - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा भाईंदर शहरात  'वारकरी भवन' उभे राहणार आहे. यासाठी विशेष निधीसह आमदार व खासदार निधी मिळून 1 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच वारकरी भवनाचे काम मीरा भाईंदर शहरात सुरु होणार आहे. या निर्णयाचे वारकरी संप्रदायातील मीरा भाईंदरमधील सदस्यांनी स्वागत केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 जवळ मन ओपस या सुविधा क्षेत्र भूखंडावर 'वारकरी भवन' इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मीरा भाईंदर महापालिका महासभेतही या कामाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. 'वारकरी भवन' उभारण्यासाठी आमदार सरनाईक प्रयत्नशील होते व त्यांच्या संकल्पनेतून हे काम साकारत आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून 1 कोटी रुपये विशेष आमदार निधी आमदार  सरनाईक यांनी मंजूर करून आणला आहे. त्याचबरोबर आमदार प्रताप सरनाईक यांचा स्वतःचा 25 लाख आमदार निधी, खासदार राजन विचारे यांचा 25 लाख खासदार निधी, आमदार रवींद्र फाटक यांचा 25 लाख आमदार निधी असे एकूण 1 कोटी 75 लाख रुपये 'वारकरी भवना'साठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आता या कामाची निविदा प्रक्रिया होणार असून जानेवारी महिन्यात 'वारकरी भवना'च्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

Pratap Saranaiks concept to build Warkari Bhavan in Mira Bhayander

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT