मुंबई

VIDEO :: कुटुंब झोपेत असताना घरात लागली भीषण आग, वेळीच धग लागल्याने बाका प्रसंग टळला

सुमित बागुल

मुंबई : आठवड्याच्या सुरवातीलाच मुंबईमधून एक महत्त्वाची आणि भीषण बातमी समोर येतेय. मुंबईतील प्रतीक्षानगर भागात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात भीषण आग लागली. घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने सदर आग लागल्याचं समजतंय. शॉर्ट सर्किटमुळे सुरवातीला फ्रिजला आग लागून नंतर ही आग गॅस सिलिंडरला लागल्याचं समोर येतंय. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी घरातील सदस्य बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही घरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.  

मुंबईतील सायनमधील प्रतीक्षानगर भागात इमारत क्रमांक १४ मध्ये सदर आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास ही आग लागली. आग लागली तेंव्हा या घरामध्ये दोन लहान मुली आणि दोन महिला होत्या. घरात आग लागली तेंव्हा हे कुटुंब झोपेत होतं. मात्र आगीची धग जशी वाढली तशी कुटुंबियांना जाग आली. घरात आग लागल्याचं समजताच वेळीच या कुटुंबातील सदस्य घराबाहेर पडले आणि बाका प्रसंग टळला. काही क्षणात आगीने भीषण रूप धारण केलं आणि संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडलं. 

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की आग विझवायला तब्बल तासभर लागला. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आग विझवल्यानंतर आता कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे. या आगीत सदर घरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

pratiksha nagar fire in building number 14 due to short circuit and gas cylinder blast

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT