प्रवीण दरेकर esakal
मुंबई

प्रवीण दरेकर मजूर नाहीत; सहकार विभागाने ठरवलं अपात्र

सकाळ डिजिटल टीम

प्रवीण दरेकर यांनी मुबै बँक निवडणुकीत मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. पण मजूर म्हणून त्यांना सहकार विभागाने अपात्र ठरवले आहे.

मुंबई - मुंबै बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचं सांगत त्यांना अपात्र ठरवलं आहे. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचं सहकार विभागाने स्पष्ट केलं आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने तुम्ही मजूर आहात का अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. यावर आता सहकार विभागाने चौकशी करून दरेकर मजूर नसल्याचे अहवाल दिला आहे.

सहकार विभागाने प्रविण दरेकर यांना अपात्र ठरवताना अनेक बाबींकडे लक्ष वेधलं आहे. मजूर म्हणजे अंगमेहनतीचे आणि शारिरीक श्रमाचे काम करणारी व्यक्ती, तसंच त्याचं उपजिविकेचं मुख्य साधन हे मजुरीच असेल. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केलं आहे.

दरेकर यांची मालमत्तासुद्धा २ कोटी ९ लाख रुपेय इतकी असून, त्यांच्या नावावर ९० लाख रुपयांची संपत्ती असल्याचंही विधान परिषदेवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. शिवाय विधान परिषदेचे सदस्य म्हणून अंदाजे अडीच लाख रुपये मासिक उत्पन्न प्राप्त होत असल्याचंही दिसत असल्यानं तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असंही सहकार विभागाने त्यांच्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मजूर म्हणून म्हणून दरेकर अपात्र ठरले तरी त्यांचा मुंबै बँक निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम पडणार नाही. दरेकर हे दुसऱ्या प्रवर्गातून मुबै बँक निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. शिवाय मुंबै बँकेवरही त्यांच्याच पॅनेलने वर्चस्व राखलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT