Dombivli MIDC Blast  esakal
मुंबई

Dombivli MIDC Blast : ''डोंबिवलीत आग पण जबाबदार यंत्रणा'', भाजप नेत्याने जबाबदारी झटकली; म्हणाले...

डोंबिवलीमध्ये महिन्याभरात आगीच्या तीन घटना घडल्या आहेत. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फायर ऑडिट करण्याचा शब्द देऊन दोषींवर कारवाई होईल, असं सांगितलं होतं. आजच्या या आगीच्या घटनेनंतर मात्र भाजपने हात झटकल्याचं दिसून येतंय. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सगळं खापर यंत्रणांवर फोडलं आहे. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.

संतोष कानडे

मुंबईः डोंबिवलीमधील एमआयडीसी भागात असलेल्या इंडो अमाईन्स कंपनीला बुधवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तब्बल दोन तासांनंतर आग आटोक्यात आल्याचं अग्मिशमन दलाकडून सांगण्यात आलेलं आहे. परंतु अद्यापही आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलेलं आहे.

डोंबिवलीमध्ये एकाच महिन्यात तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फायर ऑडिट करण्याचा शब्द देऊन दोषींवर कारवाई होईल, असं सांगितलं होतं. आजच्या या आगीच्या घटनेनंतर मात्र भाजपने हात झटकल्याचं दिसून येतंय. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सगळं खापर यंत्रणांवर फोडलं आहे. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.

''डोंबिवलीतल्या आगीची जबाबदारी कुणाची?'' असा प्रश्न प्रवीण दरेकर यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि शेवटी जी यंत्रणा याबाबत जबाबदार असते तिलाच या प्रकरणात जबाबदार धरावं लागणार आहे. एमआयडीसी, फायर ब्रिगेड, इन्स्पेक्शन करणाऱ्या अथॉरिटी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे लोक तपासणी करत नाहीत, कागदावरच व्हिजीट दाखवतात. त्यामुळे या प्रकरणात कडक करावाई केली नाही तर असे प्रकार घडतच राहतील.

प्रवीण दरेकर म्हणाले की, शेवटी सरकार कुणाचं आहे आणि कुणाचं नाही हा विषयच नाही. नाहक आगी लागून निष्पाप जीव जात आहेत, हे महत्वाचं आहे. तपासणी युद्धपातळीवर झाली असती तर ही घटना घडली नसती. जेवढ्या एमआयडीसी विशेषतः केमिकल कंपन्या, इलेक्ट्रिसीटी असणाऱ्या कंपन्या तपासल्या पाहिजेत. तातडीने तपासण्या केल्या असत्या तर ही घटना टळली असती. केमिकल कंपन्यांचं एक वेगळं ऑडिट करण्याची गरज आहे. एक वेगळी समिती स्थापन करायला पाहिजे. असं म्हणत त्यांनी सरकारची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

Dr. Ambedkar Birthplace Ambadwe : बाकी सगळं ठीक, पण विकास कुठेय? डॉ. आंबेडकरांच्या मूळ गावातील रखडलेली कामे पाहून तुमचाही होईल हिरमोड; पाहा वास्तव

हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

SCROLL FOR NEXT