Pravin-Darekar sakal media
मुंबई

प्रवीण दरेकरांचा राज ठाकरेंना फोन, 'मुंबई'त भाजप-मनसे सोबत?

ओमकार वाबळे

मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मनसेने पाठिंबा द्यावा यासाठी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आणि नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर दुसरीकडे UPA बाबत शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही त्यामुळे संजय राऊत यांना UPA चे अध्यक्ष करा म्हणजे गोंधळ कळेल, अशी खोचक टीका देखील प्रसाद लाड यांनी केली आहे. (Mumbai District bank election update in Marathi)

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं समोर आलंय. भेट संपल्यानंतर लाड यांनी पत्रकारांना महत्वाची माहिती दिली.

येणाऱ्या काळात मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून ही निवडणूक पार पडली पाहिजे, असं ते म्हणाले. भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणार आहेत. त्या अनुषंगाने प्रवीण दरेकर आणि राज ठाकरेंची फोनवरती बोलणं करून दिलं, असं लाड यांनी सांगितलं. लवकरच प्रवीण दरेकर देखील ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काय म्हणाले प्रसाद लाड?

आम्हाला अपेक्षा आहे ते राज ठाकरे स्वतः बरोबर येतील. आमची भेट होत असते. परंतु जेव्हा दोन राजकीय पक्षातले लोक किंवा राजकीय नेते भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा नक्कीच होते. पण या बाबतीतला जो काही निर्णय आहे तो माननीय देवेंद्रजी आहे आणि राज ठाकरे यांचा आहे. याबाबतीत मी आता काहीच बोलणं योग्य नाही, असं लाड म्हणाले.

गेल्याच महिन्यात देवेंद्रजी पण येऊन भेटून गेले आहेत. आता सध्या आमच्या समोर जिल्हा बँक निवडणूक आहे. मुंबईमध्ये सहकार पॅनेल निवडून आणणे महत्त्वाचे आणि त्याचा प्रयत्न साठी माझा प्रयत्न होता, असं लाड यांनी स्पष्ट केलं.

भाजप मनसे पक्ष आम्ही बरोबर घेऊन सहकारामध्ये पुढची वाटचाल मुंबईचा सहकार्याचे दिशा बदलण्याचा प्रयत्न असेल. प्रवीण दरेकर , नलावडे साहेब, सिद्धार्थ कांबळे, नंदू काटकर आणि मी असे आम्ही पाच जण यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या पक्षाचे नेतृत्व पुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT