मुंबई

रेल्वेच्या वायफायसाठी आता मोजावे लागणार पैसे, असे आहेत नवे डेटा प्लान

कुलदिप घायवट

मुंबई: रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (रेलटेल) यांच्या वतीने भारतीय रेल्वे मार्गावरील साडेपाच हजारांहून अधिक स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आली. मात्र, आता 4 हजार रेल्वे स्थानकांवर हायस्पीड इंटरनेट वायफाय सुविधेसाठी रेल वायर वायफायची प्रीपेड प्लान लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना 30 मिनिटानंतर पैसे भरून वायफाय प्लान खरेदी करून रेल्वे स्थानकावर इंटरनेट सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. 

रेल्वे स्थानकांना डिजिटल स्थानक रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एक 'मिनी रत्न' योजना आणली होती. ज्यात रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. सध्या देशभरात 5 हजार 950 हजारांहून अधिक स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध आहे. रेल वायर नावाने रेल्वेने ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. मात्र आता रेल्वे प्रवाशांना स्थानकावर 30 मिनिटांनंतर सुद्धा वायफाय सुविधा घेता येणार आहे. फक्त त्यासाठी प्रवाशांना सहशुल्क प्लान खरेदी करावा लागणार आहे. रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा वापरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 1 एमबीपीएसच्या गतीने प्रतिदिन 30 मिनिटांपर्यत निशुल्क वाय-फायची सुविधा मिळते. 34 एमबीपीएसपर्यत हायस्पीड वायफाय सुविधा मिळण्याकरिता आता रेल्वे प्रवाशाला नाम मात्र शुल्कात हायस्पीड वायफाय सुविधा घेता येणार आहे. सध्या ही योजना 4 हजार रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही रेल्वे स्थानकात ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती 'रेलटेल'कडून देण्यात आली.

रेल्वे स्थानकावर हाय स्पीड वायफायसाठी आवश्यकतेनुसार प्रवाशांना हा सहशुल्क प्लान खरेदी करावा लागणार आहे. हा ऑनलाईन प्लानची खरेदी करण्यासाठी नेट बँकिंग, वॉलेट क्रेडिट कार्ड यासारख्या इतर पर्यायाचा वापर करता येणार आहे. राज्यातील 539 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरू आहे. देशातील पाच हजार 950 रेल्वे स्थानकांत वायफाय सेवा प्रवाशांना मिळत असून दरमहा साधारण 8 हजार 200 टीबीचा वापर प्रवाशांकडून करण्यात येतो. प्रति प्रवासी सरासरी 283 एमबी डाटा वापरला जात आहे.
 
असे असणार वायफाय डेटा प्लान
5 जीबी डाटा / प्रतिदिवस 10 रुपये
10 जीबी डाटा / प्रतिदिवस 15 रुपये
10 जीबी डाटा / 5 दिवस 20 रुपये
20 जीबी डाटा / 5 दिवस 30 रुपये
30 जीबी डाटा / 10 दिवस 50 रुपये
60 जीबी डाटा / 30 दिवस 70 रुपये

----------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Prepaid plan of Rail Wire WiFi launched high speed internet WiFi facility railway stations

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT