मुंबई : नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांची निवड झाली आहे. विरार पश्चिमेकडील जुन्या विवा महाविद्यालयात 14 डिसेंबरला हे संमेलन होईल. या संमेलनाचे उद्घाटन 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो करणार आहेत.
या संमेलनात राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक व अन्य मान्यवर सहभागी होतील, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या अध्यक्ष कवयित्री नीरजा यांनी दिली. यापूर्वी मुंबई, ठाणे, बुलडाणा, रत्नागिरी, गोंदिया येथे शिक्षक साहित्य संमेलने झाली असून, नीरजा, डॉ. सदानंद मोरे, शफाअत खान, रमेश इंगळे उत्रादकर, संभाजी भगत, प्रवीण बांदेकर, जयवंत पाटील, प्रा. वामन केंद्रे यांनी अध्यक्षपद भूषवलेले आहे.
विरार येथे होणाऱ्या शिक्षक साहित्य संमेलनात दिवसभर कविसंमेलन, "टॉक शो', व्याख्याने असा भरगच्च कार्यक्रम असेल, असे शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.