मुंबई

'आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार', एन्काउंटरनंतर हैद्राबाद पोलिसांची पत्रकार परिषद

सकाळ वृत्तसेवा

आजची सकाळ उजाडली ती हैद्राबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्या आरोपींच्या एन्काउंटरच्या बातमीने. एकीकडे देशभरातून एन्काउंटरचं स्वागत केलं जातंय. तर काही जणांकडून सर्व प्रकार चुकीच्या पद्धतीने हाताळला गेल्याची भावना देखील व्यक्त केली जातेय. अशातच ज्या पोलिसांनी हे एन्काउंटर केलं त्यांनी माध्यमांसमोर येत घडलेल्या सर्व प्रकारावर त्यांची बाजू मांडली. नक्की सकाळी काय झालं ? कसं झालं याची माहिती दिली.  

काय म्हणालेत पोलीस अधिकारी? 

  1. आरोपींनी डॉक्टर प्रियांका रेड्डी यांचा मोबाईल जमिनीत पुरला होता
  2. मोबाईल शोधण्यासाठी आणि एकूण प्रकार कशाप्रकारे गुन्हा घडला याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेलं होतं 
  3. घटनास्थळी नेताच या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, यामध्ये यातील आरिफ नावाच्या आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावली
  4. या आरोपींनी पोलिसांवर दगड देखील फेकून मारले
  5. घटनास्थळी चारही आरोपी आणि पोलिसांमध्ये पाच ते दहा मिनिटं चकमक झाली
  6. पोलिसांनी या आरोपींना शरणागणी पत्करण्याचं आवाहन केलं. मात्र तसं न करता या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. 
  7. स्वरक्षणासाठी पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. 
  8. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, त्यामुळे आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 
  9. सकाळी पावणे सहा ते सहा दरम्यान सदर प्रकार घडला
  10. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत
  11. या दोन्ही पोलिसांना केअर रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात आलंय.  
  12. एन्काउंटरच्या वेळी दहा पोलिस घटनास्थळावर हजर होते. 

WebTitle : press conference of telangana police on encounter of accused of dr priyanka reddy

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT