school Sakal
मुंबई

BMC चा मोठा निर्णय, ओमिक्रॉनमुळे शाळा सुरू होणार नाहीत!

ओमकार वाबळे

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने तोंड वर काढलंय. या साऊथ अफ्रिकन व्हेरिएंटमुळे 12 देशांतून येणाऱ्या व्यक्तींचं कडक सक्रिनिंग होणार आहे. दरम्यान, कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने राज्य शासनाने तिसऱ्या टप्प्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मध्ये पहिली ते चौथीचे वर्ग सुरू ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. मात्र, आता ओमिक्रॉनचा धोका ओळखून मुंबई महानगरपालिकेने 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू कऱण्याचा निर्णय़ जाहीर केल्यानंतर BMCने 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला आहे. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पहिली ते चौथीचे वर्ग तुर्तास सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात महापालिकेची बैठक पार पडली. यामध्ये पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पहिली ते चौथीच्या वर्गांबाबत नकार देण्यात आला. त्याऐवजी येत्या 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण आयुक्त राजू तडवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहा वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रेयसीनं लग्नाला नकार देताच ३० वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं; मृतदेहाजवळ प्रेयसीचा फोटो

Jalna News: अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात चैतन्य; रिअल इस्टेट, सराफासह वाहन ग्राहकांकडून आगाऊ बुकिंग; तब्बल ३० ते ३५ कोटी रुपयांच्या उलाढालीची व्यापाऱ्यांना अपेक्षा

Latest Marathi News Live Update: जळगावात सोन्याच्या दराचा उच्चांक; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर दीड लाख पार

साप्ताहिक राशिभविष्य (20–26 एप्रिल 2026) : ग्रहस्थितीचा प्रभाव; करिअर, पैसा अन् नात्यांवर काय होणार परिणाम?

RCB vs DC: मैदानात वैर, पण मनात खिलाडूवृत्ती! चालता येत नसणाऱ्या अक्षर पटेलसाठी कृणाल पांड्या बनला आधार; Photo Viral

SCROLL FOR NEXT