mumbai Sakal
मुंबई

Mumbai Crime : खून करून फरार झालेल्या कैद्याला तीन महिन्यांच्या निरंतर पाठलागानंतर अटक

अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या 28 वर्षीय फरार कैद्याला पकडण्यात पकडण्यात पोलिसाना यश मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या 28 वर्षीय फरार कैद्याला पकडण्यात पकडण्यात पोलिसाना यश मिळाले आहे. आरसीएफ पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांपासून केलेल्या अथक परिश्रमाने आरोपी अजय उर्फ कल्लू बाबू छेत्रे गजाआड झाला आहे.

आरोपी अजय उर्फ कल्लू बाबू छेत्रे याला साल 2014 मध्ये 16 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 3 वर्ष खटला चालल्यानंतर न्यायालयाने आरोपी अजयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कारागृहातील चांगले वर्तन आणि कामगिरीच्या आधारे त्याला अमरावतीच्या खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तसेच या वर्षीच्या मार्चमध्ये अजय पॅरोलवर सुटला. परंतु पॅरोलचा कालावधी संपल्यावर सुद्धा तो परतला नाही.

अमरावती कारागृहातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे, कल्लूविरुद्ध आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. आरोपी कल्लू मोबाईल फोनचा कमी वापर करत होता .ज्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करणे कठीण होते.

कल्लूने लिहिलेल्या आणि मिळालेल्या हस्तलिखित पत्रांच्या मदतीने त्याचे चेंबूर येथील अमरीक संसोगा या महिलेशी कथित संबंध असल्याची पोलिसाना माहिती मिळाली. महिलेच्या घरी आरोपी कल्लुचे कपडे सापडल्यानंतर, अमरिक संसोगा हिला फरारी कैद्याला आश्रय दिल्याबद्दल अटक करण्यात आली.

कल्लूने अमरीकला त्याच्या आईचा मोबाईल वरून केलेल्या फोन कॉलची माहिती पोलिसांना मिळाली. जो या प्रकरणात पोलिसांसाठी आशेचा किरण ठरला. आरोपी कल्लु त्याच्या आईसोबत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसाना आता त्याच्या स्थानाबद्दल पक्की माहिती मिळाली.

अखेर कल्लूला सापळा रचून अटक करण्यात आली. कल्लूला बाहेर पडणे अशक्य करण्यासाठी तुरुंग प्रशासनाने त्याला काळ्या यादीत टाकले आहे. सध्या त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले असून पोलीस या प्रकरणात दोषारोपपत्र तयार करत आहेत, जे लवकरच न्यायालयात सादर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT