मुंबई

तात्पुरता जामीन मंजूर करा --- अन्यथा कारागृहांमध्ये भयावह स्थिती ओढावेल

सुनिता महामुनकर


मुंबई : गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या कारागृहातील बंद्यांनाही तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

लॉकडाऊन असतानाही कारागृहातील कोरोना बंद्यांची संख्या वाढत आहे, जर सरकारने याला प्रतिबंध केला नाही तर कारागृहात अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण होईल अशी भीती याचिकेत व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकत्या मेधा पाटकर यांनी नैशनल अलायन्स फोर पिपल्स मुव्हमेंटच्या वतीने ही याचिका केली आहे.

कोरोनाचा संसर्ग कारागृहात होऊ नये म्हणून कारागृहातील बंद्यांना तात्पुरता जामीन मंजूर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पाश्वभूमीवर राज्य सरकारने एका उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार गंभीर गुन्हा दाखल नसलेले आणि ज्या आरोपींची शिक्षा सात वर्षापर्यंत असेल त्या आरोपींनाच तात्पुरता जामीन मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गंभीर आरोप असलेले (हत्या, आर्थिक फसवणूक इ.) बंद्यांना जामीन मंजूर करु नये असे समितीने स्पष्ट केले आहे. या तरतुदींना हायकोर्टमध्ये आव्हान देण्यात आले आहे. 

कारागृहातील गर्दी कमी करून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र राज्य सरकारने बंद्यांचे वर्गीकरण करुन कारागृहातील गर्दी कायम ठेवली आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका सर्वांना आहे, त्यामुळे जामीन मंजूर करताना असा भेदभाव होता कामा नये. सध्या सुमारे पंधरा कारागृहांंमध्ये कोरोना पोहचला असून परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. अशावेळी सरकारने जामीन मंजूर करण्यासाठी जाचक अटी ठेऊ नये आणि अन्य बंद्यांचा ही जामिनासाठी विचार करावा, अशी मागणी केली आहे.

आतापर्यंत 631 जणांना कोरोना बाधा झाली असून चारजणांचा म्रुत्यु झाला आहे. एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी कवी वरावरा राव यांचा रिपोर्ट देखिल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे कारागृहांमध्ये तातडीने सुरक्षा योजना सुरु केल्या नाही तर कारागृहांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. एड सतीश तळेकर आणि एड माधवी अय्यपन यांच्यामार्फत याचिका करण्यात आली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT