mahesh gaikwad 
मुंबई

कल्याणमध्ये कोरोनाची भीती दाखवून रुग्णांची लूट...

सकाळ वृत्तसेवा

कल्याण: कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला केवळ पीपीई कीटचे 27 हजार रुपये बिल आकारल्याची घटना समोर आली आहे. यामुळे कोरोना आजाराची रुग्णांना भीती दाखवून खासगी रुग्णालयात लुटीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. केडीएमसीचे शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी सबंधित रुग्णालयात धाव घेत रुग्णालय प्रशासनाला चांगलेच  धारेवर धरले.

कल्याण पूर्वेत राहणारे रविंद्र राजभर हे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असलेल्या एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर रवींद्र यांना त्या खासगी रुग्णालयातील मॅनेजमेंटने उपचाराचे बिल त्याच्या हाती दिले. तेव्हा त्या बिलात तीन दिवसात पीपीई कीटचे 27 हजार रुपये आकारल्याचे नमूद केले. हा प्रकार राजभर यांच्या नातेवाईकांनी नगरसेवक महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगितला. त्यानंतर नगरसेवक महेश गायकवाड यांनी रुग्णालयात धाव घेऊन त्या रुग्णालय प्रशासनास धारेवर धरत बिलाची रक्कम कमी करून घेतली. यापुढे रूग्णांकडून जादा रक्कमेची लूट केली. तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही या खासगी हॉस्पिटला नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवार पंतप्रधान मोदींना का भेटले? अखेर कारण आलं समोर; दोन पानी पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Donald Trump Tariff: ट्रम्प यांचा नवा ‘टॅरिफ बॉम्ब’! जेनेरिक औषधांवर २०० टक्के टॅरिफ; भारतावर मोठा परिणाम?

Shiv Sena MPs: उद्धव ठाकरेंच्या ६ खासदारांच्या विलयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार; पण नोटीस जारी, पुढील सुनावणी कधी?

Live Updates Marathi: विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करा- गांधी

Ajit Pawar Jayanti: स्वर्गीय अजित पवार जयंतीनिमित्त भीमाशंकर साखर कारखान्यात १० एकरांवर आंबा लागवड; एआय तंत्रज्ञानावर ऊसशेती मेळाव्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT