मुंबई

एसटीच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे पाचपट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावी जातात. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांची लूट करणे सुरू केले आहे. रेल्वे, एसटीचे तिकीट वेळेवर मिळत नसल्याने प्रवाशांना एसटीच्या तुलनेत चक्क पाचपट भाडेवाढ सहन करावी लागत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणासह इतर शहरांमध्ये जाणाऱ्यांची प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी रेल्वेने आणि एसटीने आधीच आरक्षण सुरू केले; मात्र अतिरिक्त आरक्षणसुद्धा संपुष्टात आले असल्याने खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी आपल्या भाड्यात वाढ केल्याचे दिसून येत आहे. एसटीच्या शिवशाहीने मुंबई-पुणे प्रवास करण्यासाठी 440 रुपये भाडे असताना खासगी ट्रॅव्हल्स एक हजारपेक्षा जास्त भाडे वसूल करीत आहे.

सिंधुदुर्गला जाण्यासाठी एसटीने 595 रुपये भाडे लागत असताना, खासगी ट्रॅव्हल तब्बल 2500 रुपये भाडे आकारत आहे. रत्नागिरीला जाण्यासाठी एसटीचे भाडे 470 आहे; तर खासगी ट्रॅव्हल्स 1200 रुपयांपर्यंत भाडे आकारत असल्याचे दिसून येत आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य परिवहन विभागाने एसटीच्या तुलनेत दीडपट भाडेवाढीचे अधिकार दिले आहेत; मात्र खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून न्यायालयाच्या आदेशाला डावलून प्रवाशांची सर्रास लूट केली जात आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांनी रेल्वे, एसटीचे अतिरिक्त बुकिंग केल्याने, इतर प्रवाशांचे मात्र हाल होण्याची शक्‍यता आहे.

अवैध ट्रॅव्हल्स वाहतूक आणि जादा प्रवासी भाडे वसूल करणाऱ्यांवर राज्य परिवहन विभागाने कारवाई करणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईतील दादरसह इतर ठिकाणांहूनही धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर कोणत्याही प्रकारची कारवाईच होत नसल्याने, परिवहन विभागावरच प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT