problem house was solved and road completed kdmc Ayre village development plan is completed sakal
मुंबई

Sakal Impact : 'त्या' घराचा प्रश्न सुटला आणि रस्ता पूर्ण झाला

आयरे गावातील विकास आराखड्यातील रखडलेला रस्ता पूर्णत्वास

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - केडीएमसीच्या विकास आराखड्यात रस्ता मंजुर असून देखील आयरे वासियांना कच्च्या रस्त्याचा वापर करावा लागत होता. मागील वर्षी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आणि सीमेंट कॉंक्रीट रस्ता बांधणीला सुरुवात झाली.

रस्त्याचे 70 टक्के काम पूर्ण झाले असताना पालिका अधिकाऱी जागे झाले आणि त्यांना रस्त्यात येणाऱ्या एका घराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे लक्षात आले. याविषयी दै. सकाळने मार्च महिन्यात ''आयरे गावात घराने अडविला डिपी रोड'' या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने ही गोष्ट मनावर घेत न्यायालयातील हे प्रकरण मार्गी लावले. अखेर सर्व अडथळे दूर होऊन या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आयरे वासियांना चांगला रस्ता उपलब्ध झाला आहे.

डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव परिसरात मोठ मोठी गृहसंकुले उभी राहीली असून या परिसराचा विकास होत आहे. केडीएमसीच्या विकास आराखड्यात असलेला बालाजी गार्डन गृहसंकुलाकडे जाणारा रस्ता अनधिकृत चाळींमुळे गेले अनेक वर्षे रखडला होता.

येथील रहिवाशी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्याकडे काही राजकीय वरदहस्तामुळे पालिका अधिकारी दुर्लक्ष करत होते. याविषयी येथील रहिवाशी वारंवार कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, स्थानिक माजी नगरसेवक मंदार टावरे यांच्याकडे समस्या मांडत होते.

दरम्यान पालिकेचे तत्कालीन नगरसेवक मंदार टावरे यांनी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून 20 लाखांचा खासदार निधी मिळविला. परंतू पालिकेच्या गलथान कारभारामुळे हा निधी सुद्धा परत जाण्याची दाट शक्यता होती.

रस्ते कामासाठी हा निधी अपुरा असल्याने आमदार पाटील यांनी आमदार निधीतून 25 लाखाचा निधी रस्ते कामासाठी दिला. रस्त्याचे काम सुरु झाले मात्र काम सुरु झाल्यानंतर अनधिकृत बांधकामाच्या एका घराचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्याची उपरती पालिका प्रशासनाला झाली आणि बांधकाम रखडले होते.

याविषयी दै सकाळने मार्च महिन्यात वृत्त प्रसारीत केले होते. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी याच्यावर लवकरच हायकोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती दिली होती. सदर प्रकरणात महापालिकेच्या पॅनलवर वर्षानुवर्षे तेच वकील असून कोर्टाकडून आदेश आणण्यासाठी त्यांचे कासवगतीने प्रयत्न सुरु असल्याची ओरड आमदार पाटलांनी केली होती.

'स्थानिक रहिवासी चौधरी हे देखील कोर्टाच्या कामात सातत्याने लक्ष घालून होते. अखेर कोर्टाने संबंधित तक्रारदारास नोटीस बजावली होती. त्यांच्याकडून सुनावणीसाठी कोणीही उपस्थित रहात नसल्याने न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर हे घर पाडून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांना कच्च्या रस्त्याने ये जा करत होते. पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात चिखल होत असल्याने वाट काढणे नागरिकांना कठीण जात असे. आता नागरिकांना सीमेंट कॉंक्रीटचा रस्ता उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT