मुंबई

वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; पहिली गुणवत्ता यादी 15 नोव्हेंबरला

तेजस वाघमारे

मुंबई, ता.5 : कोरोना पार्श्वभूमीवर यंदा नीटचा निकाल विलंबाने जाहीर झाला. नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर सीईटी सेलने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 5 नोव्हेंबरपासून नोदणी करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी 15 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलमार्फत 5 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. https://cetcell.net/UGNEET2020 या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहितीपत्रक सेलने संकेतस्थळावर जाहीर केले आहे. यामध्ये उपलब्ध जागांची माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. 6 ते 13 नोव्हेंबरपर्यंत एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम ऑनलाईन भरायचा आहे. एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तात्पुरती यादी 13 नोव्हेंबरला तर पहिली गुणवत्ता यादी 15 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल.

यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी ऍण्ड ओ, बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती सीईटी सेलकडून सांगण्यात आली आहे.

( संपादन -  सुमित बागुल )

process of medical admissions starts first cut off list will be declared on 15th November 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT