हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे मुंबई पोलिसांवर आरोप, तपास CBI कडे वर्ग करण्याची मागणी

हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे मुंबई पोलिसांवर आरोप, तपास CBI कडे वर्ग करण्याची मागणी

मुंबई, ता. 5 : फेक टीआरपी (Fake TRP ) प्रकरणातील तक्रारदार हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडने मुंबई पोलिसांवर आरोप केले असून तपास सीबीआय किंवा अन्य यंत्रणेकडे वर्ग करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. 

रिपब्लिक टीव्हीवर आरोप करण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दबाव येत आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच हंसाकडून देण्यात आलेला रिपब्लिक संबंधित एक अहवाल अमान्य करण्याची मागणी पोलिस करत आहेत आणि त्यासाठी वारंवार हंसाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करीत आहे, असा दावा केला आहे.

यामध्ये मुंबई पोलिस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांचा उल्लेख याचिकेत केला आहे. न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर आज सुनावणी झाली. तर पुढील सुनावणी याच महिन्याच्या 25 तारखेला  रोजी होणार आहे. अद्याप या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला नाही, असे यापूर्वी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

पैसे देऊन कृत्रिम पद्धतीने टीआरपी वाढविण्यात आला असा आरोप पोलिसांनी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी अन्य काही चॅनल्सचीही चौकशी सुरू आहे.

fake TRP case hansa research group filed petition against mumbai police

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com