handicapped  sakal media
मुंबई

दिव्यांगांना राहत्या ठिकाणाजवळील पदोन्नतीने पदस्थापना मिळण्यास अडचण

तेजस वाघमारे

मुंबई : दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना गट अ आणि गट ब मधील पदांवर पदोन्नत्ती (promotion) द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने (mumbai high court) दिले आहेत. याकडे राज्य सरकारचे (Maharashtra government) दुर्लक्ष होत असून काही विभागांमधील पदोन्नती छुप्या पद्धतीने करण्याचा घाट घालण्यात येत असून यामुळे दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना (handicapped) त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळील पदोन्नतीने पदस्थापना मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने राज्य सरकार आणि म्हाडाकडे केली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर्ग अ आणि वर्ग ब मध्ये पदोन्नती देण्याचे धोरण तयार केले आहे. या पदोन्नती 1 जून 2021 च्या रिक्त पदांनुसार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभाग, प्राधिकरणे आणि मंडळाने याबाबत सूचना दिल्या आहेत. यानंतरही विविध विभागणीकडूनच याप्रश्नी करवाई होत नसल्याने दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पदोन्नती करण्यासाठी निवड समितीची विशेष बैठक आयोजित करून सरकारला दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे कळविणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक आहे. मात्र समितीकडून नावे न तयार केल्याने रखडलेल्या पदोन्नती छुप्या पद्धतीने करण्याचा घाट काही विभागांकडून घालण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळील पदोन्नतीने पदस्थापना मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. याबाबत दिव्यांग संघटनेने सरकार आणि म्हाडाला पत्र दिले असून त्यावर अद्याप कोणाताही निर्णय घेतला नसल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

तसेच मुंबईत रिक्त पदे असतानाही काही दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत. दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांची बदली त्यांच्या रहात्या घराजवळ करावी असा शासन निर्णय सरकारने काढला असतानाही कर्मचाऱ्यांची बदली मुंबईबाहेर केली आहे. सरकारच्या निर्णयाची माहिती दिल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याची बदली मुंबईत केली नसल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT