ठाणे : मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) नंतर प्रस्तावित मुंबई-हैदराबाद (Mumbai-Hyderabad) बुलेट ट्रेन (Bullet train) ठाण्यातून (Thane) धावणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हाय स्पीड (National High Speed) रेल्वे (Railway) कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ६५० किमी अंतराचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. यात ठाणे (Thane) जिल्ह्यातील सुमारे ९ किमी अंतराचा समावेश आहे.
प्रकल्पासाठी जिल्ह्यातील म्हातार्डी, बेटावडे, आगासन टारफे-पाचनाड, उसळघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली या गावांचा समावेश असून सुमारे १२०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. असे झाल्यास भविष्यात ठाणे जिल्ह्यातून दोन बुलेट रेल्वे धावणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांत बुलेट हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्व स्तरांतून हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद, मुंबई- नागपूर आणि आता मुंबई- हैदराबाद हे तीन प्रकल्प प्रामुख्याने हाती घेतले. त्यापैकी मुंबई-अहमदाबाद बुलेटला होणारा विरोध मावळल्यानंतर मुंबई- हैदराबाद हा एक प्रकल्प आखला जात आहे. त्याअनुषंगाने प्रस्तावित मुंबई -हैदराबाद अतिजलद रेल्वेसंदर्भात सोमवारी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसमोर सादरीकरण करण्यात आले. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या प्रस्तावित मुंबई-हैदराबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाची माहिती उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक एस. के. पाटील, एजिस इंडिया प्रा. लिमिटेडचे प्रकल्प संचालक सत्यव्रत पांडे, शाम चौगुले उपस्थित होते.
सध्या या प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरण, वाहतुकीवरील परिणाम, बाधित कुटुंबांवर व संबंधित गावावर होणारे परिणाम आदींचा अभ्यास व सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे ड्रोनद्वारेही सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती यावेळी प्रकल्पाच्या सल्लागार डॉ. अपर्णा कांबळे यांनी दिली.
प्रकल्प असा
मुंबई ते हैदराबाद हाय स्पीड रेल्वे ही एकूण ६४९.७६ किमी धावणार
हा मार्ग संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर असणार.
दहा डब्ब्यांमध्ये ७५० प्रवासी वाहतूक क्षमता.
प्रवासाचा कालावधी १४ तासांवरून ३ तासांवर येणार.
ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद व हैद्राबाद अशा दहा स्थानकांचा समावेश.
महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यांतून धावणार रेल्वे.
ठाणे जिल्ह्यातील एकूण ९ किमीचा समावेश.
प्रकल्पासाठी जिल्ह्यातील सुमारे १२०० हेक्टर जमीन लागणार.
ठाण्यातील म्हातार्डी, बेटावडे, आगासन टारफे-पाचनाड, उसळघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख) या गावांचा समावेश.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.