prostitution business in the name of massage parlour dombivli crime police SAkal
मुंबई

Dombivli Crime News : मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापर; डोंबिवलीत एकाला अटक

मसाज पार्लरच्या नावाखाली डोंबिवलीत देह व्यापार सुरू होता

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - मसाज पार्लरच्या नावाखाली डोंबिवलीत देह व्यापार सुरू होता. मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत या ठिकाणाहून 5 तरुणीची सुटका करत व्यवस्थापक नितीन भुवड याला अटक केली आहे. पार्लरचा मालक मुकुंद वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत.

डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय परिसरात आर्किनिया इमारत आहे. या इमारतीत आर्चिस स्पा नावाचे मसाज पार्लर आहे. याठिकाणी तरूणींना आणून देह व्यापार केला जात असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या पार्लरवर काही दिवसांपासून पाळत ठेवण्यात आली होती.

व्यापार संकुलाचे या भागात मोठे हब आहे. त्यामुळे तरूण, तरूणींचा या भागात सतत वर्दळ असते. अनेक तरूणी या मसाज पार्लरमध्ये देह व्यापार करत असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी शुक्रवारी या पार्लरवर छापा टाकला. या पार्लरमधील पाच तरूणींची सुटका केली. या घटनेच्यावेळी तेथे उपस्थित असलेला व्यवस्थापक भुवड याला पोलिसांनी अटक केली.

या पार्लरचा चालक वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत. हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता. आतापर्यंत किती तरूणींना या पार्लरमध्ये आणले गेले. या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे, असे डोंबिवलीचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT