Mhada sakal media
मुंबई

म्हाडाचे लाभार्थी घरापासून वंचित

म्हाडाचे लाभार्थी घरापासून वंचित खोणी येथे निषेध आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : मौजे खोणी (Khoni) येथे म्हाडाच्या (MHADA) वतीने घरकुल योजना प्रकल्प सुरू आहे. २०१८ साली काढण्यात आलेल्या सोडतीतील लाभार्थ्यांना (beneficiaries) मार्च २०२१ मध्ये घराचा ताबा (Possession) मिळणे अपेक्षित असताना बांधकामास दिरंगाई झाल्याने त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. यामुळे म्हाडाने आम्हाला दरमहा १० हजार रुपये द्यावे किंवा बँकेने (Bank) घेतलेल्या पूर्ण हप्त्यातील अर्धी रक्कम परत करावी, अशी मागणी संतप्त लाभार्थ्यांनी केली आहे. रविवारी खोणी (Khoni) येथे या लाभार्थ्यांनी एकत्र येत शासनाचा निषेध केला

म्हाडा कोकण मंडळातर्फे खोणी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सदनिका उभारण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील सदनिकांचे बांधकाम सध्या सुरू असून यातील २०३२ सदनिकांची ऑगस्ट २०१८ मध्ये सोडत काढण्यात आली. यातील पात्र लाभार्थ्यांना येत्या मार्च २०२१ मध्ये घरांचा ताबा देण्याची मुदत देण्यात आली होती. कोरोनामुळे कामास विलंब झाला असल्याने घराचा ताबा मिळण्यास उशीर होणार आहे. म्हाडाकडून ठोस असे उत्तर येत नसल्याने संतप्त लाभार्थ्यांनी रविवारी खोणी येथे निषेध व्यक्त केला. या वेळी शिवसेनेचे स्थानिक समाजसेवक कुणाल पाटील त्यांच्यासोबत उपस्थित होते.

लाभार्थी रवींद्र भोसले म्हणाले, आमच्या हक्काच्या घरापासून आम्ही किती दिवस वंचित राहणार. घरासाठी बँकेचा हप्ता एकीकडे भरत आहोत; तर दुसरीकडे भाडे भरत आहोत. म्हाडाने आम्हाला महिना १० हजार द्यावेत जोपर्यंत ताबा मिळत नाही किंवा आमचा शेवटचा हप्ता माफ करावा. किमान अर्धी रक्कम तरी, या मागण्या असून खासदार डॉ. शिंदे यांना भेटून म्हाडा अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणार आहोत.

दत्तात्रय पवार म्हणाले, आतापर्यंत केवळ १०१६ घरे तयार झालीत, पण त्यांचेही काम अपूर्ण आहे. काम कधी पूर्ण होईल ती तारीख आम्हाला कळवावी.

म्हाडाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र रविवारची सुट्टी असल्याने त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते.

लॉटरी लागल्यानंतर तीन वर्षांचा कालावधी दिला होता. आता दोन वर्षे लागतील असे बोलले जात आहे, नक्की घर कधी मिळणार.

- भूषण पवार, लाभार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT