मुंबई

Uttan: वाढवण बंदराचा निषेध, मच्छिमारांनी दाखवले काळे झेंडे!

Latest Narendra Modi News: मच्छिमारांचे ज्येष्ठ नेते लिओ कोलासो तसेच बर्नड डिमेलो यांना सकाळपासूनच पोलिसांनी नजरकैदेत ठेवले.

सकाळ डिजिटल टीम

Palghar News: वाढवण बंदराचा निषेध म्हणून उत्तन मधील मच्छीमारांनी समुद्र किनाऱ्यावर काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. मात्र पोलिसांनी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे झेंडे जप्त केले. दुसरीकडे मच्छिमारांचे ज्येष्ठ नेते लिओ कोलासो तसेच बर्नड डिमेलो यांना सकाळपासूनच पोलिसांनी नजरकैदेत ठेवले.

वाढवण बंदराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. या बंदराचा मच्छिमारांनी तीव्र विरोध करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मच्छिमारांचे नेते लिओ कोलासो पालघर येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असतानाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर दुसरे नेते बर्नड डिमेलो याना उत्तन मध्येच ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही नेत्यांना सुमारे तासभर उत्तन सागरी पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर दोघांना त्यांच्या कार्यालयातच पोलिसांच्या पहाऱ्यात नजर कैदेत ठेवण्यात आले व त्यांना नोटीस बजावली.

मात्र मच्छिमारांनी मागे न हटता आपले आंदोलन सुरू केले. उत्तन मधील भुतोडी बंदर, पाली येथील समुद्र किनाऱ्यावर तसेच चौक बंदरावर तीव्र निदर्शने केली. मच्छिमारांना उध्वस्त करणारे वाढवण बंदर आम्हाला नको अशा घोषणा देत मच्छिमारांनी काळे झेंडे दाखवले. मात्र पोलिसांनी त्याठिकाणीही कारवाई करत काळे झेंडे जप्त केले.

वसई, पालघर, डहाणू तसेच मुंबई तही सर्व ठिकाणी वाढवण बंदराविरोधात मच्छिमारांनी तीव्र आंदोलन करत आहेत असे असताना उत्तन मध्येच मच्छीमाराना आंदोलन करण्यास मनाई का असा संतप्त प्रश्न बर्नड डिमेलो यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT