मुंबई

जेएनयू शुल्कवाढीविरोधात मुंबईत आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाच्या शुल्कवाढीविरोधात बुधवारी (ता. 20) विविध संघटनांनी जॉइंट ऍक्‍शन कमिटी फॉर सोशल जस्टीस या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील मुख्य गेटबाहेर आंदोलन केले. या वेळी आयआयटी मद्रासमध्ये फातिमा लतिफ आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या वेळी आंदोलकांनी केली. या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

शुल्कवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. यानंतरही विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभरातील विद्यापीठांमध्ये पाहावयास मिळत आहेत. जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी विविध संघटनांनी एकत्रित येत कलिना कॅम्पसच्या गेटबाहेर आंदोलन केले. या आंदोलनात मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आयआयटी मद्रासमधील अल्पसंख्याक विद्यार्थिनीला प्रशासनाने मानसिक त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप या वेळी विद्यार्थ्यांनी केला. फातिमा लतिफ आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या वेळी विद्यार्थ्यांनी केली. 

जेएनयू विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कमी पैशांत चांगले शिक्षण मिळत आहे. मागासवर्गीयांना दर्जेदार शिक्षण मिळू नये यासाठी विद्यापीठाकडून शुल्कवाढ करण्यात येत असल्याचा आरोप स्टुडंट इस्लामिक संघटनेचे रफिद साहेब यांनी केला. फातिमा लतिफ आत्महत्या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी या वेळी त्यांनी केली. या आंदोलनाला समता विद्यार्थी आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्यार्थी भारती, छात्र भारती आणि भारत बचाओ आंदोलन अशा अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT