विश्वनाथ पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र sakal
मुंबई

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा...

विश्वनाथ पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अमोल सांबरे

विक्रमगड : राज्यात होणारा सततचा अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे गेली पाच वर्ष दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेला शेतकरी आता हतबल, हताश व उध्वस्त झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांबाबत शासनाची उदासीन भूमिका चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई एकरी रु.25000/- देण्यात यावी आणि सक्तीच्या कर्जवसुलीला स्तगिती देऊन संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. एका बाजूला कोरोना महामारीचे संकट असताना सर्व उद्योग धंदे बंद किंवा 'वर्क फ्रॉम होम' असताना शेतकऱ्यांनी मात्र त्यांचे काम अविरत सुर ठेऊन अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू ठेवले, परंतु सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेल्या नुकसानी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच कोरोनाचे भीषण सावट व सतत होणाऱ्या लॉकडाउनचे संकट त्यामुळे निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न भीषण स्वरूप धारण करत आहे. गेली सतत पाच वर्ष पावसामुळे खरीप व रब्बी हंगाम अतिवृष्टीमुळे नष्ट झाला. शेतकरी करीत असलेला वीट भट्टी, गवत पावली विक्रीचा व्यवसाय व भाजीपाला लागवड वाया गेली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची साधने बंद झालेली आहेत. दुसरीकडे शासनाने कर्जमाफीचे धोरण योग्य पद्धतीने न राबविल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखात भर पडली आहे. बँकांनी जबरदस्तीने कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा लावून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे शासनाने या सर्व परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना विशेषबाब म्हणून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी विश्वनाथ पाटील यांनी केली आहे.

कुणबी सेनेच्या मागण्या-

  • महाराष्ट्रात तातडीचा ओला दुष्काळ जाहीर करावा.

  • संपूर्ण महाराष्ट्रात सरसगट पाऊस पडल्याने पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई एकरी रु.25000/- देण्यात यावी

  • सक्तीच्या कर्जवसुलीला स्तगिती देऊन संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.

सत्तेत मश्गुल असलेले राजकारणी दर महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये सक्रिय असून, जनतेच्या जीवन-मरणाच्या प्रश्नात त्यांना रस उरलेला नाही असा आरोप करत नोकरशाही भ्रष्टाचारात दंग असून प्रशासन ठप्प आहे. अशा वेळी केवळ एखादे निवेदन देऊन परिस्थितीत फरक पडणार नाही असा आरोप विश्वनाथ पाटील यांनी केला आहे. तसेच, ऑनलाइन पंचनामे केले जातील अशी खोटी आश्वासने शेतकऱ्यांना मिळतील, पावसाने उभ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झोडपून काढले आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सरकारने आपल्या मागण्यांची योग्य ती दखल घेतली नाही तर आर पारच्या लढाईशिवाय पर्याय नाही. म्हणून आता महा आंदोलनासाठी सर्व शेतकरी वर्ग तरुण तरुणींनी तयार राहावे असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या पत्राची दखल मुख्यमंत्री कशी घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अन्यथा एस टी कामगारांच्या आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागले यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT