मुंबई

मालवणी परिसरातील दलित बांधवांना सुरक्षा प्रदान करा; भाजप आमदाराची मागणी

तुषार सोनवणे

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षानेही मुंबईच्या समस्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मालवणी मलाडमधील अनुसूचित समाजावर होत असलेल्या अन्यायावर बोट ठेवले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांवर भारतीय जनता पक्ष आक्रमक पणे भूमिका घेत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा ( Mangalprabhat lodha ) यांनी आज मलाड परिसरातील अनुसूचित समाजाच्या अन्यायाबाबत ट्विट केले. आणि त्यांना न्याय मिळण्याची मागणीही केली. त्यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, ' मुंबईतील मालवणीमध्ये दलित बांधवांवर अन्याय होत आहे. आज त्यांच्याशी याविषयावर चर्चा केली. काश्मीरमध्ये हिंदू अंल्पसंख्याक झाल्यावर जो त्रास १९९०साली त्यांना झाला. तसाच त्रास मालवणीतील बांधवांना होत आहे. या परिसरात अवैध बांधकाम, अंमली पदार्थांची तस्करी, या समस्यांनी गंभीर स्वरूप घेतले आहे. या सगळ्यांचा त्रास दलित बांधवांना होत आहे. त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी दलित बांधवांना सुरक्षा प्रदान करावी '. लोढा यांच्या ट्विटनंतर तरी या परिसरातील बांधवांना सुरक्षा मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 -----------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

'मोठी लाट आली अन् लाटेबरोबर मी आणि अक्षय समुद्रात बुडालो' लारा दत्ताने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली...'अक्षयचं डोकं आपटलं अन्…'

Cameron Green: कॅमेरॉन ग्रीनच्या KKR साठी का गोलंदाजी केली नाही? अजिंक्य रहाणेच्या टोल्यानंतर थेट क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच दिलं स्पष्टीकरण

प्राजक्ता माळीने ज्वेलरी ब्रॅण्ड 'प्राजक्तराज' बद्दल घेतला मोठा निर्णय; कारण सांगत म्हणाली, 'मला खूप अडथळे...'

बीड हादरलं! प्रेम प्रकरणाचा भीषण शेवट; प्रियकरानं टायर पंक्चरच्या दुकानात संपवलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, 'मला मारहाण करत...'

SCROLL FOR NEXT