सोरायसिस बळावतोय... रुग्णांनो काळजी घ्या! दुर्लक्ष न करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
सोरायसिस बळावतोय... रुग्णांनो काळजी घ्या! दुर्लक्ष न करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन 
मुंबई

सोरायसिस बळावतोय... रुग्णांनो काळजी घ्या! दुर्लक्ष न करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

मिलिंद तांबे

मुंबई : कोव्हिडमुळे सोरायसिसग्रस्त रुग्णांच्या चिंतेत भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक रुग्णांना उपचार घेता आले नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचा आजार बळावला असून नैराश्‍य आले आहे. याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्‍टरांनी दिला आहे.

लॉकडाऊनमध्ये उपचार न मिळाल्याने सोरायसिसग्रस्त रुग्णांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाला. रुग्णांमध्ये तणाव तसेच नैराश्‍य वाढले. त्यामुळे या कसोटीच्या काळात रुग्णांनी आजाराच्या व्यवस्थापनाकडे सकारात्मक व सर्वांगीण दृष्टिकोनासह बघावे, असा सल्ला अखिल भारतीय त्वचाविज्ञान आणि कुष्ठशास्त्रज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ. किरण गोडसे यांनी दिला आहे. सोरायसिसचा लठ्ठपणा, कार्डिओव्हॅस्क्‍युलर आजार यांसारख्या समस्यांशीही घनिष्ट संबंध असल्याने या रुग्णांना कोव्हिडचा धोकाही अधिक आहे. हे टाळण्यासाठी रुग्णाने मित्र, कुटुंबीय यांना नियमितपणे भेटायला हवे. चुकीच्या माहितीला बळी पडता कामा नये. सोरायसिसची तीव्रता नियंत्रणात ठेवण्यासाठी या आजाराची लक्षणे नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. औषधोपचारांमध्ये खंड पडल्यास आहे ती स्थिती अधिक खालावून बिकट बनू शकते. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहनही डॉ. गोडसे यांनी केले आहे. 

काय आहे सोरायसिस आजार 
सोरायसिस हा ऑटोइम्युन प्रकारातला म्हणजे रोगप्रतिकार यंत्रणा अनियंत्रित पद्धतीने कार्यरत झाल्याने उद्भवणारा एक आजार असून, यात त्वचेवरील पेशींची नेहमीपेक्षा खूपच वेगाने वाढ होते. सोरायसिसमध्ये दर 3 ते 4 दिवसांत नव्या त्वचापेशी तयार होतात. त्यामुळे जुन्या पेशी झडण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी त्वचेवर नव्या पेशींचा थर जमा होतो. त्वचा कोरडी, खाजरी बनते. तिचे पापुद्रे निघतात, त्यावर लाल चट्टे किंवा चंदेरीसर खवले दिसतात. दुर्लक्ष केल्यास हा आजार अधिक बळावण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञ डॉक्‍टर सांगतात. 

रुग्णांनी तणाव, मद्यपान टाळायला हवा. लक्षणे तीव्र करणारे निराळे घटक समजून घ्यायला हवेत. जीवशास्त्राचे उपचार सुरू ठेवायचे किंवा सुरू करण्याचा निर्णय त्वचातज्ज्ञाने त्या-त्या रुग्णाबाबत केला पाहिजे. ऑनलाईन सल्ल्याचा रुग्णांना उपचार सुरू ठेवण्यात किंवा डॉक्‍टरांचा सल्ला पाळण्यात उपयोग होऊ शकतो. भारतीय वैद्यकीय परिषदेनेही टेलिकन्सल्टेशन अधिकृत व कायदेशीर केल्याने त्याचा फायदा रुग्णाने घ्यायला हवा. 
- डॉ. किरण गोडसे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय त्वचाविज्ञानी आणि कुष्ठशास्त्रज्ञ संघटना 

-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT