मुंबई

सुशातसिंह मृत्यू प्रकरणी मीडिया ट्रायलविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल

सुनिता महामुनकर

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरु असलेल्या मीडिया ट्रायल विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. काही वृत्तवाहिन्या करीत असलेल्या वृत्तांकनमुळे तपास आणि न्याय प्रक्रियेत बाधा येण्याची शक्यता आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

एड राजेश इमानदार, एड शाश्वत आनंद आणि आनंद भट या तिघांनी केलेल्या याचिकेत काही वृत्तहिन्यांना सनसनाटी वृत्तांकन करण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे. वार्तांकन करण्यासाठी मनाई नसून तपास आणि सत्य बाहेर येण्यासाठी बाधा येईल असे वृत्तांकन करु नये, अशी मागणी केली आहे.

यामध्ये टाईम्स नाऊ, रिपब्लिक टीव्ही, एनडीटीव्ही, झी न्यूज, इंडिया टुडे आणि न्यूज18 या वृत्तवाहिन्यांचा उल्लेख केला आहे. सीबीआय तपासाबरोबर माध्यमे देखील समांतर तपास करीत असून जाहीर करत आहेत. यामुळे पत्रकारिता मूल्येदेखील कमी होत आहेत, त्यामुळे प्रेस कौन्सिल औफ इंडिया आणि न्युज ब्रौडकास्टर असोसिएशन आणि केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे निश्चित करावी, अशी मागणी केली आहे. मिडियावर बंधने नको पण लक्ष्मणरेषा असावी, असेही स्पष्ट केले आहे. सुशांतसिंहने 14 जून रोजी आत्महत्या केली होती आणि सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करीत आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT