Mumbai High Court sakal media
मुंबई

सरकारने बूस्टर डोसचे नियोजन तातडीनं करावं; मुंबई हायकोर्टात जनहित याचिका

सुनिता महामुनकर

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (corona third wave) पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोसचे नियोजन (Booster dose) नागरिकांसाठी तातडीने करण्यासाठी सरकारने धोरण (Government policy) निश्चित करावे, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) जनहित याचिका (public interest litigation) करण्यात आली आहे. (Public interest litigation in Mumbai high court for booster dose management through government)

वकील ध्रुती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी ही याचिका केली आहे. कोविड 19 ची संभाव्य तिसरी लाट देशभरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बूस्टर डोसचे लसीकरण शक्य तितक्या लवकर नागरिकांना देण्याची गरज आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे सर्वत्र गर्दी होत आहे. त्यामुळे लवकर बूस्टर डोस मिळणे नागरिकांसाठी हितावह ठरु शकते असा दावा याचिकेत केला आहे.

मात्र अद्यापही केंद्र, राज्य सरकारने आणि मुंबई महापालिकेने याबाबत कोणतेही नियोजन किंवा योजना आखलेली नाही. या विलंबामुळे नागरिकांना अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे याचिकेत निदर्शनास आणण्यात आले आहे. सरकारने आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत उत्तमपणे काम केले आहे. मात्र आतादेखील बूस्टर डोस पुरवठा करून नागरिकांना सुरक्षित ठेवायला हवे. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांची प्रतिकारशक्ती काही महिन्यांनी कमी होत असते. अशावेळी बूस्टर डोस महत्त्वाचा ठरु शकतो, असे सुचविण्यात आले आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी घरोघरी लसीकरण मोहिमेसाठी याचिकादारांनी याचिका केली होती. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यावर राज्यात ही मोहीम सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

SCROLL FOR NEXT