Gaimukh Ghat Road Traffic Jam

 

ESakal

मुंबई

Thane News: ठाण्यात खड्डे भरण्याचा विचित्र प्रकार, बांधकाम विभागावर नागरिकांचा संताप

Thane Road Construction: गायमुख घाटावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडी भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. यामुळे घाटावर चढणारी वाहने अडकण्याचे प्रकार घडले असून नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे शहर : गायमुख घाटावर पडलेले खड्डे भरण्याचा विचित्र आणि तेवढाच संताप आणणारा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. खड्ड्यांमध्ये फक्त खडी भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला; मात्र या प्रकारामुळे भरलेली खडी संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने घाटावर चढणारी वाहने अडकण्याचे प्रकार घडले.

या प्रकारामुळे वर्सोवा चौकाकडे जाणारी वाहने घाटावरच बंद पडली. त्यामुळे मानपाडा ते गायमुख घाटाचे १० मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना तीन तास लागले. तर वाहतूक पोलिसांना कोंडी दूर करण्यासाठी पहाटेपर्यंतची वाट पाहावी लागली.

तीन महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाट रस्त्यावर मास्टिंग केले होते; आता या घाटावर पडलेले खड्डे भरण्याचे काम पुन्हा गुरुवारी (ता. ११) हाती घेण्यात आले आहे; परंतु खड्डे भरताना सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरमिश्रित खडी न टाकता फक्त खडी टाकून खड्डे भरले. मात्र ही खडी संपूर्ण रस्त्यावर पसरली. या खडीत वाहनांचे टायर एकाच जागेवर फिरत होते.

रात्री एक वाजेपर्यंत असाच प्रकार सुरू होता. त्यामुळे गायमुख घाट ते माजिवडा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. झालेला चुकीचा प्रकार लक्षात येताच विभागाकडून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून रस्त्यावर पसरलेली खडी जमा करून वाहून नेली. पुन्हा पडलेले खड्डे पूर्ववत केले. त्यानंतर घाटावर बंद पडलेली वाहने पुन्हा सुरू झाली.

डांबराचा टँकर बंद पडल्याचे कारण

गायमुख घाटात पडलेल्या खड्ड्यातील खडीवर डांबर टाकले जाणार होते; मात्र गुजरातकडून येणाऱ्या डांबराचा टँकर रस्त्यातच बंद पडल्याने टाकलेली खडी बाहेर काढावी लागल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Naharhari Zirwal: आगामी निवडणुका महायुतीच्याच चौकटीत: मंत्री नरहरी झिरवाळ; राज्यस्तरीय सहा सदस्यीय समिती घेणार अंतिम निर्णय

Solapur Banana Market: केळीच्या दरात घसरण; २६ रुपये किलोचा दर ३ रुपयांवर, निर्यातदारांची बागांकडे पाठ; साेलापुरातील उत्पादकांचे हाल

उमेश कामत पहिल्यांदाच दिसणार डॉक्टरच्या भूमिकेत ! ताठ कणा सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Latest Marathi Breaking News Live: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली व कोल्हापूर ऊस दरावरून कार्यकर्त्यांची धरपकड

Solapur Crime: 'साेलापुरात फोटो व्हायरलची धमकी देऊन विनयभंग'; पाच संशयित आरोपींविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT