mumbai sakal
मुंबई

Mumbai News : साठवणीतील माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन ; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

लेखक दिलीप प्रधान यांनी लिहिलेल्या त्यांच्या 'साठवणीतील माणसं' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मुलुंड पूर्व येथील मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लेखक दिलीप प्रधान यांनी लिहिलेल्या त्यांच्या 'साठवणीतील माणसं' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मुलुंड पूर्व येथील मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार साहित्यिक विजय कुवळेकर होते तसेच या कार्यक्रमास महाराष्ट्राचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लेखक दिलीप प्रधान यांनी या पुस्तकात कॉ .श्रीपाद अमृत डांगे, बाळासाहेब ठाकरे, अहिल्याबाई रांगणेकर, नानी पालखीवाला, पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर, जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, गृह सचिव राम प्रधान, स्वातंत्र्य सैनिक दत्ता ताम्हणे आणि ग.प्र .प्रधान अशा दहा जणांची व्यक्तिचित्र चितारलेली आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार साहित्यिक विजय कुवळेकर यांनी लेखक दिलीप प्रधान यांचे कौतुक करताना, उपस्थित श्रोत्यांना सांगितले की, लेखक दिलीप प्रधान यांनी सकाळ वृत्तपत्रासाठी पंचवीस तीस वर्षांपूर्वी केलेलं हे लेखन आहे.

वास्तविक ते पूर्वीच पुस्तक रूपात प्रकाशित व्हायला हवं होतं, पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तशी ती वेळ आता आली आहे, आणि कालच्या आजच्या टप्प्यावर ते येणं हाही सुयोग म्हणायला हवा. असं सांगून कुवळेकर पुढे म्हणाले, दिलीप प्रधान यांनी या पुस्तकातील आपल्या लेखांमधून, यात चितारलेल्या सर्व व्यक्तिमत्वांमधील प्रत्येकाचं स्वतःच असं वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे तसेच त्यांच्यातील समाजहिताबद्दल असलेली तळमळ,कार्यमग्नता आणि सच्चेपण हे या सर्व व्यक्तिमत्त्वामध्ये समाईक आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुशीलकुमार शिंदे आणि अरुणभाई गुजराथी यांनी देखील यांनी देखील आपल्या भाषणातून लेखक दिलीप प्रधान यांचे एक उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल कौतुक केले आणि उपस्थित श्रोत्यांना यातील बहुतेक सर्वच व्यक्तींबरोबर एकेकाळी आपले राजकीय आणि व्यक्तिगत संबंध असल्याचे सांगून त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी उलगडून सांगितल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेखक दिलीप प्रधान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, हे पुस्तक आताच का लिहावेसे वाटले हे उपस्थित श्रोत्यांना सांगून,या दहा व्यक्तींनी केलेल्या त्या अजोड कार्याला आणि त्यांच्या काही आठवणींना उजाळा देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे हे उपस्थित श्रोत्यांना सांगितले आणि तसेच या पुस्तकातील या सगळ्या माणसांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्या त्या काळी मुलाखती घेण्याची संधी मिळाली याबद्दल सकाळचे तत्कालीन संपादक राधाकृष्ण नार्वेकर आणि संपादक विजय कुवळेकर यांचे आभार मानले.

कार्यक्रमाला जेष्ठ नाट्य दिगदर्शक, विजय केंकरे, जेष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे, अजित तेंडुलकर, यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक महत्वाची मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ प्रकाशनचे शिवाजी धुरी यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने केले. दिलीप प्रधान यांचे 'साठवणीतील माणसं' हे पुस्तक सिद्धार्थ प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT