Pune Ganpati Visarjan 2023 Watch on processions through CCTV Police force ready  sakal
मुंबई

Pune Ganpati Visarjan 2023 : मिरवणुकांवर ‘सीसीटीव्ही’तून नजर; विसर्जन सोहळ्यासाठी पोलिस दल सज्ज

नियंत्रण कक्ष ः सर्व प्रमुख रस्त्यांवरील मिरवणुकांत संशयितांच्या हालचालींवर सीसीटीव्ही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू म्हणून शहर पोलिसांनी नियोजन केले आहे. सर्व प्रमुख रस्त्यांवरील मिरवणुकांत संशयितांच्या हालचालींवर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येईल.

यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. सुमारे नऊ हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शहरात घातपात घडविण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली.

त्यांचा एक साक्षीदार अद्याप फरारी असून त्याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मागील काही दिवसांत झडती आणि नाकाबंदी करून सुमारे तेरा हजार संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

मिरवणूक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी तसेच सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. त्यासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील,

रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, अमोल झेंडे, श्रीनिवास घाडगे, ए. राजा, रोहिदास पवार तसेच सर्व सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

साध्या वेशातही पोलिस

मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी आणि महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील गुन्हे शाखेच्या पोलिसांचा बंदोबस्त असेल. गुन्हे शाखेतील सहायक आयुक्त-१ सुनील तांबे आणि सहायक आयुक्त-२ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युनिट आणि पथकांकडून सराईत गुन्हेगार आणि चोरट्यांवर नजर ठेवण्यात येत आहे.

२०५ सीसीटीव्ही

प्रमुख मिरवणूक मार्गांवर २०५ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पोलिस आयुक्तालय आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT