Shivtirth 
मुंबई

राणेंनी दर्शन घेतल्यानं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं शुद्धिकरण!

शिवसेनेचं हे कृत्य कोत्या मनाचं असल्याची भाजपची प्रतिक्रिया

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं. पण त्यांच्या या कृतीनंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं शुद्धिकरण केल्याचा धक्कायदायक प्रकार घडला आहे. या कृत्याचा भाजपंनं निषेध केला असून शिवसेना कोत्या मनाची असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

नारायण राणे यांनी गुरुवारी सकाळी बाळासाहेब ठाकरे याचं स्मृतीस्थळ असलेल्या मुंबईतील शिवाजी पार्क मैदान अर्थात शीवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन केलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते. अभिवादनानंतर ते तिथून निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी ज्या चौथऱ्यावर बाळासाहेबांचा फोटो लावलेला आहे तो चौथरा गोमूत्रानं स्वच्छ करुन, त्यावर दुग्धाभिषेक करुन त्याचं कथीत शुद्धिकरण केलं आणि पूजाही घातली.

भाजप नेते आशिष शेलार काय म्हणाले?

"अशुद्ध आणि शुद्ध असं न माणणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ही अवस्था आहे. शुद्धिकरण करायचंच असेल तर शिवसेनेचं करायला पाहिजे. सोनिया गांधींच्या साथीने विश्वासघातानं सत्तेत आलेल्या शिवसेनेचं शुद्धिकरण बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं करायला लागेल. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये टाकलं त्यांच्याबरोबर सत्तेत बसायचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना बगल देणाऱ्या शिवसेनेचं शुद्धिकरण करणं गरजेचं आहे. त्यामुळं शिवसेनेनं शुद्धिकरणाची नौटंकी करु नये," असं भाजपे नेते आशिष शेलार म्हणाले.

शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे काय म्हणाल्या?

शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. जर त्यांना तसं वाटतं असेल तर ते योग्य आहे. कारण राणे कुटुंबियांनी ठाकरे कुटुंबाला इतका त्रास दिलेला आहे आणि इतकी बदनामी केलेली आहे. एकीकडे बाळासाहेब माझे सर्वकाही आहेत असं म्हणायचं आणि त्यांच्याशीच गद्दारी करायची आणि पुन्हा त्यांचेच आशीर्वाद मागायला यायचं हे कुठल्या तत्वामध्ये बसतं. यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र संताप आहे त्यातूनच शिवसैनिकांनी हे केलं, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली आहे.

दुग्धाभिषेक घालणाऱ्या शिवसैनिकाची प्रतिक्रिया

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. मात्र, नारायण राणे यांच्या या कृतीने कट्टर शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. शिवसेना उपशहर प्रमुख अप्पा पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दुधाचा अभिषेक घालत, गोमूत्र शिंपडत शुद्ध केलं. शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्या नारायण राणे यांच्या स्मृती स्थळावर येण्याने हे स्थळ अपवित्र झाले आहे. ते मी पवित्र करत आहे अशा भावना या शिवसैनिकाने मांडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT