मुंबई

PWD च्या टोल नाक्यांवर FASTAG चं भिजत घोंगडं

तीन वर्षांपासून अंमलबजावणीच नाही!

प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्र सरकारने फास्टॅग (FASTAG) धोरणाची घोषणा करुन तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, तरीदेखील राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोल नाक्यांवर फास्टॅगचे भिजत घोंगडं दिसून येत आहे. राष्ट्रीय, एमएसआरडीसीच्या मार्गावरील टोल नाके कॅशलेस झाले असतांना, पिडब्ल्यूडीच्या टोल नाक्यांवर मात्र, अद्याप अंमलबजावणी सुरूच झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकवेळा फास्टॅग युजर्सच्या पिडब्ल्यूडीच्या टोल नाके पार करतांना त्रास सहन करावा लागत आहे. (Pwd-toll-booths-as-fastag-rules-kick)

सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यभरात एकूण 18 पथकर आहे. ज्यामध्ये प्रत्येक लेन फास्टॅग करण्यासाठी प्रत्येकी 25 लाखांचा खर्च आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी येण्या-जाण्याच्या 2 लेनवर तरी फास्टॅगची अंमलबजावणी करून कॅशलेस सुविधा देणे अनिवार्य आहे. मात्र, पिडब्ल्यूडीच्या एकाही टोल नाक्यांवर फास्टॅग लावण्यात आले नाही. पीडब्ल्यूडीची मोठी यंत्रणा असताना फास्टॅग करण्याचे काम सध्या एमएसआरडीसीकडे सोपविण्यात आलं असून, कॅशलेस फास्टॅग प्रणाली उभारण्यासाठी सुमारे तब्बल 13 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार, राज्यातील वाहतूकदार, खासगी वाहनधारकांकडून फास्टॅगचा वापर होत आहे. मात्र, बऱ्याच वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोल नाका पार करतांना वाहनधारकांना पुन्हा पैसे मोजावे लागत असल्याने, फास्टॅगचा वापर करून फायदा तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बऱ्याचवेळा एकाचवेळी राष्ट्रीय,राज्य आणि पिडब्ल्यूडीचे टोल नाके पार करावे लागत असल्याने, यापूर्वी फास्टॅगची जबरदस्ती केली, आता मात्र, फास्टॅग लावल्यानंतरही पिडब्ल्यूडीच्या नाक्यांवर पैसे मोजावे लागण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते असल्याचे पालघर येथील रहिवासी स्वप्नील ठाकरे यांनी सांगितले आहे.

"फास्टॅगची अंमलबजावणी सुरू आहे. लवरकच राज्यभरातील टोल नाक्यांवर फास्टॅग यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे", असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाळके यांनी सांगितलं.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT