नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय; ...दिले आदेश! 
मुंबई

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय; ...दिले आदेश!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकाम केलेली घरे कायम करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे; तसेच धोरण तयार करताना किचकट नियमांचा त्यात समावेश करण्यात येऊ नये, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून गरजेपोटी बांधकाम केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकरच दूर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिडकोने जमीन घेऊन शहर वसविले; मात्र प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकाम केलेली घरे नियमित केले नाहीत. साडेबारा टक्के गावठाण योजना असताना प्रकल्पग्रस्तांना प्रत्यक्षात पावणेनऊ टक्के भूखंड दिला जातो. गेली ४२ वर्षे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने करूनही प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशाच पडली आहे. अखेर भूमिपुत्रांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, याबाबतचे निवेदन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिले होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्याकडे लक्ष दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याची जबाबदारी सोपवल्यावर बबन पाटील यांनी शिंदे यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. शुक्रवारी (ता.१६) शिंदे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी गावठाणामध्ये गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यासाठी सर्वेक्षण करा, सर्वेक्षण करताना प्रकल्पग्रस्तांच्या सूचनांकडे लक्ष द्या, त्यांना विश्वासात घ्या आणि तातडीने धोरण तयार करा, असे निर्देश सिडको अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सिडकोने वसाहती उभ्या केल्या; मात्र प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे सिडकोने दुर्लक्ष केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको अधिकाऱ्याची बैठक घेऊन गरजेपोटी बांधकाम केलेली घरे कायम करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची प्रमुख मागणी गरजेपोटी घरांची मागणी होती. ती लवकरच दूर होणार आहे. 
- बबन पाटील, अध्यक्ष, आगरी-कोळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT